Saturday, October 25, 2025
Happy Diwali

घराच्या या दिशेला अ‍ॅक्वेरियम ठेवणे मानले जाते शुभ

घराच्या या दिशेला अ‍ॅक्वेरियम ठेवणे मानले जाते शुभ

मुंबई: जर तुम्हाला मासे पाळण्याचा छंद असेल तर तुम्ही घरात अ‍ॅक्वेरियम लावू शकता. असे केल्याने अनेक फायदे आपल्याला मिळतात. घरात ठेवलेले फिश अ‍ॅक्वेरियम केवळ घराची शोभाच वाढवत नाहीत तर यासोबतच घर आणि कुटुंबातील लोकांसाठीही हे शुभ असते.

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये फिश अ‍ॅक्वेरियम ठेवल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात.दरम्यान, घरामध्ये फिश अ‍ॅक्वेरियम ठेवण्याआधी त्याची योग्य दिशा माहीत असणे गरजेचे असते. त्याची काळजी जरूर घ्यावी.

घरात जर तुम्हाला फिश अ‍ॅकेरियम ठेवायचे असेल तर त्याला ईशान्य कोपऱ्यात ठेवले पाहिजे. ईशान्य कोपऱ्यात फिश अ‍ॅक्वेरियम ठेवल्याने घरात येणारी आर्थिक तंगी दूर होते. तसेच घरात सुख समृद्धी येते.

वास्तुशास्त्रानुसार हे ही लक्षात ठेवले पाहिजे की जर घरात फिश अ‍ॅक्वेरियम ठेवले तर त्याची योग्य ती साफसफाई झाली पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार जर साफ सफाई ठेवली गेली नाही तर यामुळे नुकसान होऊ शकते. तसेच आर्थिक अडथळे येऊ शकतात.

फिश अ‍ॅक्वेरियममध्ये खूप जास्त किंवा कमी मासे ठेवल्या नाही पाहिजेत. फिश अ‍ॅक्वेरियममध्ये ९ मासे ठेवणे चांगले मानले जाते.

Comments
Add Comment