Tuesday, May 13, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

IND Vs ENG: शमीला बेंचवर बसवणे, ३ स्पिनर्स खेळवणे...इंग्लंडविरुद्ध भारताचा परफेक्ट प्लान

IND Vs ENG: शमीला बेंचवर बसवणे, ३ स्पिनर्स खेळवणे...इंग्लंडविरुद्ध भारताचा परफेक्ट प्लान

मुंबई: भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर बुधवारी खेळवण्यात आला. यात भारतीय संघाने ७ विकेट राखत विजय मिळवला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने या सामन्यात काही खास प्लान केला होता. हा प्लान परफेक्ट ठरला.


या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला प्लेईंग ११मध्ये निवडण्यात आले नव्हते. सोबतच कर्णधार सूर्याने या सामन्यात तीन स्पिनर्स उतरवले होते. त्याच्या या निर्णयाने सारेच आश्चर्यचकित झाले होते मात्र सामना जिंकल्यानंतर हा निर्णय योग्य ठरला.



अर्शदीपचे यश


सूर्याने सामन्यात शमीला बसवून एकच स्पेशलिस्ट वेगवान गोलंदाज खेळवला होता. हा अर्शदीप होता. याशिवाय दोन वेगवान गोलंदाज ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि नितीश कुमार रेड्डीही होे. मात्र अर्शदीपने पहिल्या षटकापासून आपले रंग दाखवायला सुरूवात केली. त्याने पहिल्या ओव्हरमध्ये मोठे यश मिळवून दिले होते. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये संघाला दुसरे यश मिळवून दिले. अर्शदीपने १७ धावांवर इंग्लंडला दोन मोठे धक्के दिले.



तीनही स्पिनर्सना उतरवण्याची रणनीती यशस्वी ठरली


कर्णधार सूर्याने या सामन्यात ३ स्पिनर अक्षर पटेल, रवी बिश्नोई आणि वरूण चक्रवर्ती यांना खेळवले होते. तीनही की प्लेयर ठरले. वरूणने सर्वाधिक ३ विकेट मिळवले. तर अक्षऱला २ विकेट मिळवण्यात यश आले. रवीला विकेट मिळाला नाही मात्र त्याने धावांवर लगाम ठेवला.

Comments
Add Comment