Saturday, May 10, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Republic Day 2025 : प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख करणार पुष्पवृष्टी

Republic Day 2025 : प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख करणार पुष्पवृष्टी

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या राजधानीतील कर्तव्यपथावरील मुख्य सोहळयात महाराष्ट्राची कन्या फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख ध्वजारोहणानंतर ध्वजावर पुष्पवृष्टी करणार. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामधील देवडी गावची दामिनी दिलीप देशमुख वायुदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणुन कार्यरत असून राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या मुख्य सोहळयात ‘परेड कमांडर’ म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.


दामिनीचे वडील न्यायधीश दिलीप देशमुख हे पुणे विभागाचे माजी धर्मादाय आयुक्त कमिशनर असून त्यांचा कुटुंबियांचा सामाजिक आणि शैक्षणिक वारसा दामिनीने आपल्या मेहनतीने पुढे नेला आहे. वर्ष २०१९ मध्ये देशपातळीवरील कॉमन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर पद मिळवले. दामिनी अश्वारोहन, कराटे, योगा, रायफल शूटिंग, तसेच खो-खो आणि व्हॉलीबॉलमध्येही प्राविण्य मिळवली आहे. ती कराटेमध्ये ब्लॅक बेल्टची सुवर्णपदक विजेती आहे.



ध्वजारोहण दरम्यान पुष्पवृष्टी करणार


२६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रपती ध्वजारोहण करतील त्यावेळी ध्वजाला मानवंदना देण्यासाठी विमानातून पुष्पवृष्टी करण्याची जबाबदारी फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख यांना सोपविली आहे.

Comments
Add Comment