अंबरनाथ : अंबरनाथमध्ये डोंबिवली- बदलापूर पाईपलाईन मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. एका मद्यधुंद ट्रेलर चालकाने उलट्या दिशेने गाडी चालवत ५० वाहनांना धडक दिली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही काही जण जखमी झाले आहेत. (Ambernath Accident)
Weather Update : थंडी पळाली, उकाडा वाढणार; हवामान विभागाचा अंदाज!
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथमध्ये नेवाळी नाक्याकडून बदलापूरच्या दिशेने निघालेल्या भरधाव ट्रेलरने नेवाळी नाक्यावर एका वाहनाला धडक दिली. त्यानंतर पालेगाव, अंबरनाथ आनंदनगर पोलीस चौकी, वैभव हॉटेल चौक, सुदामा हॉटेल चौक असा संपूर्ण रस्ता भरधाव वेगात चुकीच्या बाजूने जात या ट्रेलरने अनेक वाहनांना धडक दिली. यामध्ये पोलिसांच्या गाडीसह कार, दुचाकी, रिक्षांचा समावेश आहे.
या घटनेनंतर पोलिसांसह इतर नागरिक ट्रेलरचा पाठलाग करु लागले. यादरम्यान, ट्रेलर चालकाने अतिवेगामुळे ट्रेलर चालवला आणि हा ट्रेलर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. यावेळी पोलिसांनी या ट्रेलर चालकावर झडप घालत त्याला बेड्या ठोकल्या. (Ambernath Accident)