बांगलादेश सीमेवर बीएसएफची गस्त वाढवली

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष निर्देश


कोलकाता: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा दलाच्या ( बीएसएफ) अतिरिक्त महासंचालकांनी सर्व फील्ड फॉर्मेशन्सना गस्त वाढवण्याचे आणि कुंपण नसलेल्या सीमांवर सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनापूर्वी, बीएसएफने भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमा आणि सीमा चौक्यांच्या कडेकोट सुरक्षेसाठी त्यांच्या सर्व फील्ड फॉर्मेशन्समध्ये 'ऑप्स अलर्ट' सुरू केला आहे. या कालावधीत भारत-बांगलादेश सीमेवर गस्त वाढवण्यात आली आहे. पश्चिम बंगाल ते मेघालयापर्यंत भारताची बांगलादेशशी ४,०९६ किमी लांबीची सीमा आहे. बीएसएफचे मुख्य विशेष महासंचालक (पूर्व कमांड) चे जनसंपर्क अधिकारी यांनी गुरुवारी सांगितले की, या बीएसएफचे अतिरिक्त महासंचालक (पूर्व कमांड) रवी गांधी यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. बीएसएफच्या ऑपरेशनल तयारी आणि धोरणात्मक तैनातीवर लक्ष ठेवण्यासाठी गांधी स्वत: बंगालच्या सीमावर्ती भागाला भेट देत आहेत. अतिरिक्त महासंचालकांनी सर्व फील्ड फॉर्मेशन्सना पाळत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत आणि विशेषतः नदीच्या किनारी आणि कुंपण नसलेल्या सीमांवर सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

अधिकाऱ्याने सांगितले की, 'ऑप्स अलर्ट' सराव दरम्यान, बीएसएफचे जवान सीमेवर आणि सीमेजवळील अंतर्गत भागात विविध सुरक्षा सराव करतील. याशिवाय, सीमेवर घडणाऱ्या घटनांना तोंड देण्यासाठी विविध ऑपरेशनल प्रक्रियेच्या प्रमाणीकरणासह सीमावर्ती लोकसंख्येच्या क्षेत्रांशी संवाद साधण्याचे कार्यक्रमही आयोजित केले जातील. हा 'ऑप्स अलर्ट' सराव बुधवारपासून सुरू झाला असून आगामी 31 जानेवारीपर्यंत चालणार आहे.

Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व