प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष निर्देश
कोलकाता: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा दलाच्या ( बीएसएफ) अतिरिक्त महासंचालकांनी सर्व फील्ड फॉर्मेशन्सना गस्त वाढवण्याचे आणि कुंपण नसलेल्या सीमांवर सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनापूर्वी, बीएसएफने भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमा आणि सीमा चौक्यांच्या कडेकोट सुरक्षेसाठी त्यांच्या सर्व फील्ड फॉर्मेशन्समध्ये ‘ऑप्स अलर्ट’ सुरू केला आहे. या कालावधीत भारत-बांगलादेश सीमेवर गस्त वाढवण्यात आली आहे. पश्चिम बंगाल ते मेघालयापर्यंत भारताची बांगलादेशशी ४,०९६ किमी लांबीची सीमा आहे. बीएसएफचे मुख्य विशेष महासंचालक (पूर्व कमांड) चे जनसंपर्क अधिकारी यांनी गुरुवारी सांगितले की, या बीएसएफचे अतिरिक्त महासंचालक (पूर्व कमांड) रवी गांधी यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. बीएसएफच्या ऑपरेशनल तयारी आणि धोरणात्मक तैनातीवर लक्ष ठेवण्यासाठी गांधी स्वत: बंगालच्या सीमावर्ती भागाला भेट देत आहेत. अतिरिक्त महासंचालकांनी सर्व फील्ड फॉर्मेशन्सना पाळत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत आणि विशेषतः नदीच्या किनारी आणि कुंपण नसलेल्या सीमांवर सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
अधिकाऱ्याने सांगितले की, ‘ऑप्स अलर्ट’ सराव दरम्यान, बीएसएफचे जवान सीमेवर आणि सीमेजवळील अंतर्गत भागात विविध सुरक्षा सराव करतील. याशिवाय, सीमेवर घडणाऱ्या घटनांना तोंड देण्यासाठी विविध ऑपरेशनल प्रक्रियेच्या प्रमाणीकरणासह सीमावर्ती लोकसंख्येच्या क्षेत्रांशी संवाद साधण्याचे कार्यक्रमही आयोजित केले जातील. हा ‘ऑप्स अलर्ट’ सराव बुधवारपासून सुरू झाला असून आगामी 31 जानेवारीपर्यंत चालणार आहे.