 
                            मुंबई : २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिन. दरवर्षी प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी सकाळी शाळा, कॉलेज, ऑफिस आणि सोसायटीमध्ये ध्वजवंदन पार पडते. एखाद्या प्रसंगासाठी खूप खास, सुंदर आणि त्या थीमला शोभणारे कपडे घालणे हा एक वेगळाच आनंद असतो. विशेषत: त्या थीमला साजेसे असे कपडे परिधान केले की तो दिवस देखील खूप खास वाटतो. महत्त्वाचे म्हणजे जर हा प्रसंग राष्ट्रीय उत्साहाचा असेल, तर उत्साह अधिकच वाढतो. दरम्यान, अवघ्या काही दिवसांवर २६ जानेवारी हा महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी देशभक्तीची भावना व्यक्त करणारे आणि आपल्याला चांगले दिसू देणारे असे काहीतरी परिधान करावे, असे सर्वांनाच वाटते. पण, नेमके काय परिधान करावे? हे मात्र, सूचत नाही. पण, आज आम्ही तुम्हाला असेच काही खास आऊटफिट सांगणार आहोत. जे तुम्ही प्रजासत्ताक दिनानिमित्त परिधान करू शकता.
सफेद कुर्ता
 
प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला साधं आणि सोप्प तयार व्हायचं असेल, तर सफेद रंगाचा कुर्ता आणि सफेद पॅन्ट परिधान करू शकता. काही मुलींना आऊटफिट चांगले परिधान केले की, मेकओव्हर सुद्धा चांगला करण्याची आवड असते. तुम्ही या आऊटफिटवर तिरंग्याचे स्मोकी आय नक्की ट्राय करू शकता, ओपन केस, मोठे कानातले परिधान केले की लूक उठून दिसेल.
रंगीबेरंगी दुपट्टा
 
या दिवशी तुम्हाला पारंपरिक सफेद रंगाच्या कुर्त्यावर लेगिंग्ज किंवा जिन्स परिधान करून त्यावर तिरंगी रंगाची ओढणी, रंगीबेरंगी ओढणी, बांधणीची ओढणी अथवा भरजरीची ओढणी परिधान करू शकता. यामधील कोणताही दुपट्टा तुमच्या सौंदर्याला चारचांद लावेल यात शंका नाही. यावर सिल्वर ज्वेलरी यांसह लाईट मेकअपवर आपण सिंपल आणि क्युट दिसाल.
सफेद शॉर्ट कुर्ती आणि जिन्स
 
प्रजासत्ताक दिन तुम्ही ग्रुपने किंवा तुमच्या फॅमिलीसोबत कुठे बाहेर जाऊन साजरा करणार असाल, तर हा ऑप्शन तुमच्यासाठी एकदम बेस्ट आहे. स्लिव्हलेस किंवा फूल स्लिव्हज व्हाईट शॉर्ट कुर्तीवर तुम्ही हाय वेस्ट जिन्स परिधान केलात आणि मोठे सिल्वर झुमके परिधान केले, तर अतिशय सुंदर लूक येईल. या आऊटफिटवर झेंडा घेऊन फोटोशूटसुद्धा सुंदर होईल.
तिरंगी रंगाची साडी
 
सफेद साड्या सगळेचं परिधान करतात पण मार्केटमध्ये व्हाईट साडीवर हिरवी आणि भगव्या रंगाची काठ असलेली साडीसुद्धा उपलब्ध आहे. तुम्हाला फक्त बाहेर कुठेतरी जाऊन या दिवशी फोटोशूट करायचं असेल, तर ही साडी तुम्ही हमखास परिधान करू शकता. या साडीवर तुम्ही तिरंग्याचा आयमेकअप केला, तर अजून सुंदर लुक येईल.
व्हाईट अनारकली
 
काही महिलांना अनारकली ड्रेस परिधान करायला खूप आवडतात. चुडीदार सलवार आणि जुळणारा दुपट्टा असलेला सूट सेट प्रत्येक महिलेला सूट होतो. या आऊटफिटला हिरव्या रंगाचं किंवा भगव्या रंगाचं डोळ्यांना आयलायनर लावलं की छान मेकओव्हर दिसेल. सोबतीलाच या ड्रेसवर तुम्ही काचेच्या रंगीबेरंगी बांगड्या, ड्रेसला मॅचिंग मोठे कानातले आणि चांदीची ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी परिधान केलात, तर अतिशय सुंदर लूक दिसेल.
व्हाईट गाऊन
 
काही मुलींना वनपिस ड्रेस परिधान करायला खूप आवडतं. प्रजासत्ताक दिनासाठी तुम्ही हा सुद्धा ऑप्शन निवडू शकता. कम्फर्टेबल व्हाईट गाऊन घेऊ शकता आणि गळ्यात ऑक्सिडाइजचं सिम्पल चोकर, ऑक्सिडाइजचे मोठे झुमके, कपाळावर एक काळी टिकली आणि केसांमध्ये गजरा माळलात तर अतिशय सुंदर लूक होऊ शकेल.
व्हाईट कॉर्डसेट
 
आता महिलांसाठी कॉर्डसेटमध्ये विविध ऑप्शन उपलब्ध आहेत. वेस्टर्न, ट्रेडिशनल, इंडोवेस्टर्न, वेगवेगळे रंगाचे, वेगवेगळ्या डिझाइन्समध्ये कॉर्डसेट मार्केटमध्ये पाहायला मिळतात. तुम्हीसुद्धा प्रजासत्ताक दिनासाठी कम्फर्टेबल व्हाईट कॉर्डसेट परिधान करू शकता. व्हाईट कॉर्डसेटवर मॅचिंग कानातले, ओपन हेअर्स, न्यूड मेकअप अतिशय सुंदर दिसेल.

 
     
    




