Tuesday, May 20, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

धक्कादायक! शेकोटीत पडून चिमुकल्याचा मृत्यू

धक्कादायक! शेकोटीत पडून चिमुकल्याचा मृत्यू
जळगाव : तालुक्यातील नांद्रा खुर्द येथून मन हेलावून टाकणारी घटना घडलीय. घरासमोर सुरू असलेल्या शेकोटीत आठ महिन्याचा चिमुकला पडून गंभीर भाजला गेला. या चिमुकल्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना मृत्यू झाला आहे.

या घटनेमुळे कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला. देवांशु सुनिल सोनवणे (वय ८, रा. नांद्रा खुर्द ता.जि.जळगाव) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे. ११ जानेवारी रोजी सायंकाळी शेकोटी लावण्यात आलेली होती. त्यावेळी देवांशु हा खेळत असतांना तो शेकोटीत पडला. त्यामुळे तो गंभीररित्या भाजला गेला होता. त्याचे वडील सुनिल सोनवणे यांनी तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. यावेळी कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला होता. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास शिंदे हे करीत आहे.
Comments
Add Comment