Monday, February 10, 2025
Homeक्रीडाIND vs ENG: कोलकातामध्ये रंगणार भारत वि इंग्लंड पहिला टी-२० सामना, किती...

IND vs ENG: कोलकातामध्ये रंगणार भारत वि इंग्लंड पहिला टी-२० सामना, किती वाजता सुरू होणार सामना जाणून घ्या डिटेल्स…

मुंबई: भारत आणि इंग्लंड(IND vs ENG) यांच्यात पहिला टी-२० सामना आज म्हणजेच २२ जानेवारीला बुधवारी कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर खेळवला जाईल. दोन्ही संघादरम्यान पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाईल. याची सुरूवात आजपासून होत आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा भारताचे नेतृत्व करताना दिसेल. तर जोस बटलर इंग्लंडचा कर्णधार असेल. दोन्ही संघादरम्यान चुरशीचा सामना होईल अशी अपेक्षा आहे.

कधी असणार सामना?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-२० सामना आज म्हणजेच २२ जानेवारीला बुधवारी खेळवला जात आहे. सामन्याची सुरूवात ७ वाजता होईल. तर टॉस त्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच साडेसहा वाजता होईल.

कुठे रंगणार सामना

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-२० सामना कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डनवर रंगणार आहे.

टीव्हीवर कुठे पाहा लाईव्ह?

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवला जाणारा पहिला टी-२० सामना भारतात स्टार स्पोर्ट्सच्या नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित केला जाणार आहे.

टी२० मालिकेसाठी भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, वाशिंगटन सुंदर, ध्रुव जुरेल.

टी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ

बेन डकेट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, जेमी ओवरटन, जॅकब बेथल, लियाम लिव्हिंगस्टोन, जोस बटलर (कर्णधार), फिल सॉल्ट, आदिल रशीद, ब्रायडन कार्स, गस एटकिंसन, जोफ्रा आर्चर, मार्क वूड, रेहान अहमद, साकिब महमूद.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -