
१० जणांचा जागीच मृत्यू, तर १५ जण गंभीर जखमी
बंगळूरू : कर्नाटकातील राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे. आज पहाटेच्या सुमारास भाजीपाला घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळळ्याची घटना घडली आहे. यामध्ये १० जणांचा जागीच मृत्यू झाला तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. अशातच ...
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे चार वाजेच्या सुमारास कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. अपघात झालेल्या ट्रकमधून भाजीपाला आणि फळं विक्रीसाठी घेऊण जाणारे व्यापारी प्रवास करत होते. राष्ट्रीय महामार्गावर गुलापुरा येथे भाजीपाला आणि फळं घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचे रस्त्यावर धुके असल्याने नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक ट्रिपरवर आदळून थेट ५० मीटर दरीत कोसळला. या अपघातामध्ये ट्रकचा चक्काचूर झाला आहे.
दरम्यान, सदर घटनास्थळी यल्लापुर पोलीस स्थानकाचे अधिकारी तपासासाठी पोहोचले असून क्रेनच्या साह्याने मृतदेह बाहेर काढले जात आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख नारण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि अपघाताबद्दल माहिती संकलित केली. पोलिसांकडून अपघातात मृत पावलेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.