Saturday, November 1, 2025
Happy Diwali

Konkan Railway : चाकरमान्यांसाठी Goodnews! आता माणगाव रेल्वे स्थानकावरही थांबणार जलद गाड्या

Konkan Railway : चाकरमान्यांसाठी Goodnews! आता माणगाव रेल्वे स्थानकावरही थांबणार जलद गाड्या

माणगाव : कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वे प्रवासादरम्यान माणगाव (Mangaon) रेल्वे स्थानकात थांबा नसल्याने अनेक गैरसोयींचा, अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आता या अडचणींना पुर्णविराम मिळाला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी मुंबई येथील अतिथी सभागृहात मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या सभेत माणगाव रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या जलद रेल्वे गाड्यांना थांबे देण्याचे आश्वासन दिले आहे.

माणगांव रेल्वे स्थानक हे रायगड जिल्हयातील एक महत्त्वाचे कोकण रेल्वेचे मध्यवर्ती स्थानक आहे. या रेल्वे स्थानकाचा लाभ माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, तळा या तालुक्यातील रेल्वे प्रवाशांना अधिक लाभ होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण रेल्वे प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्याचा मोठा अर्थिक वाटा असल्याने कोकणातील रेल्वे स्थानकात जास्तीत जास्त रेल्वे गाड्यांना थांबे द्यावेत, तेथील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, प्रवाशांसाठी उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध कराव्यात असे आदेश खासदार सुनील तटकरे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिले. याबाबत तातडीने कार्यवाही झाली नाही तर रेल्वे मंत्री अश्विनी वैश्णव यांची भेट घेऊन या समस्या मांडून या मागण्या मान्य करून घेईन असे आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी दिले.

दरम्यान, माणगाव रेल्वे स्थानकावर फलाट क्र. २ वरुन प्रवाशांना स्थानकाच्या बाहेर येण्यासाठी फलाट क्र.१ वर येण्यासाठी उंच जिन्याचा उपयोग करावा लागतो. त्यामुळे वयस्कर महिला प्रवाशांना सामान घेऊन येण्यास फारच त्रास होतो तरी फलाट क्र. २ हा पुर्वेकडे नाणोरे रस्त्याकडे उघडण्यात आला तर प्रवाशांना फार उपयोगी होईल तरी फ्लॉट क्र.२ नाणोरे रस्त्याकडे उघडण्यात यावा, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >