मुंबई : गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांच्या घटस्फोटाबाबात चर्चा सुरु आहेत. नेटकरी आणि चाहते यांच्या प्रत्येक पोस्टवर बारीक लक्ष ठेवून आहेत. अशातच युजवेंद्र चहलने नुकतेच एक फोटो सोशल मीडियाच्या इन्सटाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहे. त्या पोस्टमध्ये युजवेंद्रने दिलेला कॅप्शन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
Karnataka Accident : फळं-भाजीपाला घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळून चक्काचूर!
चहलने कॅप्शनमध्ये काय म्हटले?
युजवेंद्र चहलने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘खरं प्रेम दुर्मिळ होत चालले आहे आणि मी स्वतः दुर्मिळ आहे’ यासोबत युजवेंद्रने एक हसण्याचा इमोजी शेअर केला आहे.
दरम्यान, या पोस्टवर चाहत्यांच्या अनेक कमेंट्स देखील आल्या आहेत. तसेच हॅ पोस्ट नेमकी कोणासाठी असा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे.
View this post on Instagram