मुंबई: वाढत्या वयासोबतच चेहऱ्यावर सुरकुत्या आणि फाईन लाईन्स दिसू लागणे हे सामान्य आहे. मात्र अनेकांच्या चेहऱ्यावर वयाच्या आधीच सुरकुत्या दिसू लागतात. यामागे अनेक कारणे असू शकतात ज्यात पोषकतत्वांची कमतरता, चुकीचे खाणे-पिणे, खराब जीवनशैली, पाणी कमी पिणे, धूम्रपान आणि तणाव यांचा समावेश आहे. सुरकुत्यामुळे चेहरा म्हातारा आणि निर्जीव दिसू लागतो. अशातच अनेक जण या सुरकुत्या कमी करण्यासाठी स्किन केअर आणि ब्युटी उत्पादनांचा वापर करतात. मात्र यात हानिकारक केमिकल्स आहेत जे त्वचेला नुकसानदायक ठरतात. अशातच तुम्ही सुरकुत्या कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता.
कोरफडीचा जेल वापरा
कोरफडीच्या जेलमुळे स्किन हायड्रेट होण्यास मदत होते. तसेच कोलॅजनचे उत्पादन वाढण्यास मदत होते. यातील अँटीऑक्सिडंट तसेच पोषकतत्वे त्वचा सुधारण्यास मदत करतात तसेच सुरकुत्याही कमी करण्यास मदत करतात. कोरफडीचे जेल सरळ चेहऱ्यावर लावू शकता.
मधाचा वापर करा
मध त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. याशिवाय स्किनचा टाईटपणा टिकवून ठेवते. यात अँटी बॅक्टेरियल, अँटी इन्फ्लामेंटरी आणि अँटीऑक्सिडंट गुण असतात ज्यामुळे चेहऱ्यावरील डाग दूर होतात. तसेच तेलकट त्वचा आणि पिंपल्सची समस्या दूर होते. यामुळे स्किन सॉफ्ट आणि ग्लोईंग बनण्यास मदत होते.
व्हिटामिन ई तेलाने मसाज करा
दररोज रात्री व्हिटामिन ई तेलाने चेहऱ्याचा मसाज केल्याने केवळ तुमच्या स्किनवर ग्लोच येणार नाही तर चेहराही टाईट होईल. व्हिटामिन ई चेहऱ्याच्या सुरकुत्या आणि फाईन लाईन्स दूर करण्यास मदत करतात.