Thursday, May 15, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

Arshdeep Singh: अर्शदीप सिंहने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Arshdeep Singh: अर्शदीप सिंहने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

मुंबई: भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहने(Arshdeep Singh) ऐतिहासिक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. तो टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने ही कामगिरी इंग्लंडविरुद्ध कोलकाता टी-२०मध्ये मंगळवारी केली आहे.


इंग्लंडविरुद्ध सामन्यात त्याने २ विकेट घेत इतिहास रचला. तो टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने याबाबतीत युझवेंद्र चहलला मागे टाकले आहे. चहलच्या ८० सामन्यांत ९६ विकेट आहेत. अर्शदीपने ६१व्या सामन्यात हे यश मिळवले.



१०० विकेट घेण्याच्या जवळ अर्शदीप


या रेकॉर्डच्या बाबतीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमार खूप मागे आहेत. आता अर्शदीप ऐतिहासिक शतकाच्या जवळ पोहोचला आहे. म्हणजेच आतापर्यंत एकाही भारतीयाला हे जमलेले नाही.



सर्वाधिक टी-२० विकेट घेणारे भारतीय


९७ विकेट - अर्शदीप सिंह(६१ सामने)
९६ विकेट - युझवेंद्र चहल(८०)
९० विकेट - भुवनेश्वर कुमार(८७)
८९ विकेट - जसप्रीत बुमराह(७०)
८९ विकेट - हार्दिक पांड्या(११०)



साल्ट आणि डकेटला बाद करत केला रेकॉर्ड


अर्शदीप सिंहने कोलकातामधील सामन्यात इंग्लंडविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली. त्याने पहिल्याच षटकांत फिल साल्टला बळी बनवले. त्यानंतर डावाच्या तिसऱ्या षटकांत बेन डकेटला रिंकु सिंहच्या हाती धावबाद केले.

Comments
Add Comment