कोलकाता: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने कमाल केली. त्यांनी इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेती पहिला सामना ७ विकेट राखत जिंकला. सामन्यात इंग्लंडने विजयासाठी भारताला १३३ धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान १२.५ षटकांतच पूर्ण केले. या विजयाचे हिरो अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंह आणि वरूण चक्रवर्ती ठरले.
कोलकाताच्या इडन गार्डन्सवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात जबरदस्त झाली. दरम्यान संजू सॅमसनने २० बॉलमध्ये २६ धावा केल्या. तर सूर्य कुमार यादवला खातेही खोलता आले नाही. एकावेळेस भारतीय संघाने ४१ धावांमध्ये २ विकेट गमावल्या होत्या.
Arshdeep Singh: अर्शदीप सिंहने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय
तेव्हा अभिषेक शर्माने मोर्चा सांभाळला आणि २१ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. या दरम्यान त्याने ६ षटकार आणि ३ चौकार ठोकले. अभिषेकच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने १२.५ षटकांतच ७ विकेट राखत सामना जिंकला. या पद्धतीने भारताने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
कोलकातामध्ये झालेल्या टी-२० सामन्यात अभिषेकने ३४ बॉलमध्ये एकूण ७९ धावांची खेळी केली. यात त्याने ८ षटकार आणि ५ चौकार ठोकले. तिलक वर्मा १९ आणि हार्दिक पांड्या २ धावांवर नाबाद राहिले. अभिषेक आणि तिलक यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ४२ बॉलमध्ये ८४ धावांची भागीदारी झाली.