मुंबई : मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलची बातमी ताजी असतानाच भांडुप मधील बंद असलेल्या मॉलच्या नजीकच्या भागात महिलेचा मृतदेह आढळला आहे. या घटनेने भांडुप परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या महिलेबद्दल अधिक माहिती मिळवत असून तिच्या नातेवाइकांबद्दलही तपास करत आहेत.
मुंबईच्या उपनगरातील भांडुप स्टेशनच्या नजीक बंद असलेल्या ड्रीम मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात आज सकाळी ९:४० च्या सुमारास एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला आहे. हा ड्रीम मॉल कित्येक वर्षांपासून बंद आहे. मुसळधार पाऊस पडल्यावर या भागात पाणी साचत असल्याने बऱ्याच व्यापारांनी या मॉल मधून काढता पाय घेतला. तसेच या मॉल मध्ये मध्यंतरी आग लागल्याने हॉस्पिटलमधील पेशंट इतरत्र हलवण्यात आले होते.
Salman Khan : बिग बॉसच्या शो ला अभिनेता सलमान खानचा राम राम!
तेव्हापासून या मॉलचा दर्जा खालावला होता. त्यानंतर आज या मॉल मध्ये बेवारस मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत महिला ३० वर्षांची असल्याचा अंदाज पोलिसांनी दर्शवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिलेच्या अंगावर गुलाबी ड्रेस आणि पांढरी ओढणी असल्याचे समजले आहे. दरम्यान ही महिला कोण, ती इथे कशी आली, तिचा मृत्यू कशामुळे झाला, ही आत्महत्या आहे कि खूण अशा अनेक प्रश्नांचा छडा पोलीस लावत आहेत.