
पालघर : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पालघर वैतरणा मार्गावरील रेल्वे रुळाच्या बिघाडामुळे गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहे. यामुळे पालघर स्थानकात अनेक गाड्या खोळंबल्या आहेत.

वॉशिंग्टन:डोनाल्ड ट्रम्प यांनी आज अमेरिकेचे ४७वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. राष्ट्राध्यक्ष म्हणून हा त्यांचा दुसरा कार्यकाळ आहे. ट्रम्प ...
पश्चिम रेल्वेवरील पालघर वैतरणा मार्गावरील रुळाला तडा गेल्याने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या पालघर स्थानकात खोळंबल्या आहेत. यामुळे लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. दरम्यान रेल्वे प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. सध्या या रुळाचं दुरुस्तीचं काम चालू असून नोकरदार वर्गाला याचा फटका बसणार असल्याची माहिती मिळाली आहे.