मुंबई : मुंब्रा, कल्याण, गिरगाव भागातल्या मराठी विरुद्ध हिंदी भाषिक वादाच्या घटना ताज्या असतानाच आता दहिसर मधूनही हिंदी मराठी भाषिक वाद उफाळून आला आहे. दहिसर मधील हॉटेलच्या बाऊन्सरनी मराठी भाषेत बोलण्यास नकार दिल्यामुळे दोन बाऊन्सरसोबत एका तरुणाचा वाद झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Dr. Kisan Maharaj Sakhre Death : ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचे निधन
दहिसर मीरारोड मधील हॉटेल बाऊन्सरला एका तरुणाने मराठीत बोलायला सांगितले म्हणून बाऊन्सरने हुज्जत घालत मराठीत बोलणार नाही शिवाय मी २० वर्षांपासून इथे राहतोय मी हिंदीतच बोलणार तुला काढायचे तेवढे व्हिडीओ काढ असे हिंदीत सांगितले. यावरून हिंदी भाषिक दोन बाऊन्सरसोबत एका तरुणाचा वाद झाला. या व्हिडिओची दखल घेत मनसे अधिकाऱ्यांनी मनसे स्टाईल समाचार घेतला. आणि मराठी तरुणाची माफी मागायला लावली. दरम्यान अशा हिंदी भाषिकांची हुज्जत वाढत चालली असल्याचे समोर येत आहे.