Saturday, February 8, 2025
Homeमहाराष्ट्रनाशिकNashik Accident : एसएमबीटीजवळ भीषण अपघातात ३ जण ठार, २ गंभीर जखमी

Nashik Accident : एसएमबीटीजवळ भीषण अपघातात ३ जण ठार, २ गंभीर जखमी

इगतपुरी : घोटी सिन्नर महामार्गावरील एसएमबीटी हॉस्पिटलजवळ ओव्हरटेक करणाऱ्या MH05 FW 0030 ह्या क्रमांकाच्या रिक्षाला समोरून येणारा NL01 AF 0458 हा कंटेनर न दिसल्याने रिक्षाने कंटेनरला धडक दिली. यामुळे रिक्षा आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला. ह्या अपघातात एका बालिकेसह ३ जण ठार झाले आहेत. रिक्षाचालक अमोल विनायक घुगे वय २५ रा. नांदवली, कल्याण हा जागीच ठार तर स्वरा अमोल घुगे वय ४, मार्तंड पिराजी आव्हाड वय ६० यांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला.

Water Scheme : पिंपरी-चिंचवड शहरावर पाणी संकट?

प्रतीक्षा अमोल घुगे वय २२, कलावती मार्तंड आव्हाड वय ५८, रा. कल्याण हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत. ट्रकचालक राहुल कुमार प्रजापती वय २८ रा. झारखंड याला तपासासाठी वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. वाडीवऱ्हे पोलिसांनी पुढील तपास कसून सुरु केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -