
मुंबई : बॉलीवूडचा अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) प्रेक्षकांसमोर एका नवीन रुपातून येण्यास सज्ज झाला आहे. लवकरच त्याचा 'छावा' (Chhava) हा आगामी ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कसा दिसेल, याची झलक काही फोटोंमधून नुकतीच पाहायला मिळाली. आता अभिनेत्री रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandana) लुक देखील समोर आलाय.
दरम्यान, नुकत्याच समोर आलेल्या पोस्टरमध्ये विकी कौशलचा कधीही न पाहिलेला अंदाज पाहायला मिळतोय. या फोटोंमुळे चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच विशेष चर्चेत आहे. एका फोटोत हातात तलवार, सर्वत्र आग आणि चेहऱ्यावर प्रचंड राग दिसतोय. दुसऱ्या फोटोत हातात तलवार आणि दुसऱ्या हातात ढाल, असा लूकही आहे. तर तिसऱ्या फोटोत सर्वत्र पाणी दिसत असून, छत्रपती संभाती महाराजांच्या रुपातील विकीनं भगवी वस्त्र परिधान केली आहेत आणि लक्ष्याच्या दिशेनं धनुष्यबाण रोखला आहे. आणखी एका फोटोत त्याच्या हातात त्रिशुळ असून एका हातानं दोरखंड पकडला आहे.

अध्यात्मिक क्षेत्रातला ज्ञानतारा निखळला - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : संत साहित्याचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ कीर्तनकार, आणि वारकरी संप्रदायाचे ...
एकदंरच आग, पृथ्वी, जल आणि वायूच्या पार्श्वभूमीतील फोटो यामध्ये पाहायला मिळत आहे. विकीच्या या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव होतोय. तर दुसरीकडे महाराणी येसूबाईंची भूमिका साऊथची सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मीने मंदानाने साकारली आहे. छावा मधील महाराणी येसूबाईंचा पोस्टर नुकतंच समोर आलं आहे. या पोस्टरवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर (Laxshman Utekar) याने केलं आहे.