Saturday, September 13, 2025

धक्कादायक! अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या

धक्कादायक! अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या

वॉशिंग्टन: अमेरिकेत एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका भारतीय विद्यार्थ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यात त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, रवि तेजा असं हत्या झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. रवी हा हैदराबादचा रहिवासी आहे. पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेण्यासाठी रवी हा २०२२ मध्ये अमेरिकेत गेला होता. त्याने नुकतेच शिक्षण पूर्ण केले होते आणि नोकरीच्या संधी शोधत असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. रवी याच्यावर एका गॅस स्टेशनजवळ गोळ्या झाडण्यात आल्या. स्थानिक पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मुलाची हत्या झाल्याची माहिती कळल्यानंतर रवीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गेल्या वर्षी म्हणजे नोव्हेंबर २०२४ मध्ये शिकागोमध्ये शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या एका २६ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची अशाच पद्धतीने गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हा विद्यार्थी तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील रामन्नापेट येथील रहिवासी होता.

Comments
Add Comment