Friday, February 7, 2025
Homeताज्या घडामोडी'तनू वेड्स मनू- ३' मधून आर माधवनचा पत्ता कट?

‘तनू वेड्स मनू- ३’ मधून आर माधवनचा पत्ता कट?

मुंबई :अभिनेता आर माधवन आणि कंगना राणावत यांची मुख्य भूमिका असलेला ‘तनू वेड्स मनू’ या चित्रपटाचे दोन्ही भाग बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. चित्रपटाच्या या दोन्ही भागाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता लवकरच ‘तनू वेड्स मनू’चा तिसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आर माधवन याने या चित्रपटाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चाहत्यांचं लक्ष त्याने आपल्याकडे वेधलं आहे.

अभिनेता आर माधवनला एका मुलाखतीत तनू वेड्स मनू संदर्भात प्रश्न विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना अभिनेता म्हणाला, “मला याबद्दल कोणतीही कल्पना नाही. इन्स्टाग्रामवर सुद्धा यासंदर्भात चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर मला लोक प्रश्न विचारत आहेत. पण, अद्यापही मला आनंद एल राय किंवा इतर कोणीही ‘तनू वेड्स मनू’ च्या तिसऱ्या पार्ट संदर्भात विचारणा केलेली नाही.”

पुढे अभिनेता म्हणाला, “मला काहीच माहिती नाही शिवाय स्क्रीप्ट सुद्धा मला दिलेली नाही. कदाचित मला रिप्लेस करण्यात आलं असेल.” अभिनेता आर माधवनच्या या वक्तव्यानंतर हे नक्की झाले आहे की तो तनु वेड्स मनू चित्रपटाचा भाग नसणार आहे. त्यामुळे आता माधवन च्या जागेवर कोणता अभिनेता दिसणार हे अद्याप समोर आलेले नाही. पण माधवनला खरंच रिप्लेस केले असेल तर त्यांच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का असेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -