वॉशिंग्टन:डोनाल्ड ट्रम्प यांनी आज अमेरिकेचे ४७वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. राष्ट्राध्यक्ष म्हणून हा त्यांचा दुसरा कार्यकाळ आहे. ट्रम्प यांच्यासोबत जेडी वेन्स यांनी उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. शपथविधी समारंभाआधी त्यांनी अर्लिंग्टन नॅशनल सेमेट्रीमध्ये सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. ज्या जवानांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्या बहादूर जवानांच्या सन्मानासाठी आयोजित केला जाणारा हा सोहळा असतो. ही परंपरा नव्या राष्ट्राध्यक्षांसाठी महत्त्वाची असते. तसेच देशाच्या प्रती त्यांचा सन्मान दिसतो.
अमेरिकेत कडाक्याची थंडी असल्याने संसदेच्या आत शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी अनेक दिग्गज आले होते. यात फेसबुकचे फाऊंडर मार्क झुकरबर्ग, अॅमेझॉनचे फाऊंडर जेफ बेजोस आणि एलॉन मस्क यांचा समावेश आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर आपल्या पहिल्या भाषणात म्हटले की, अमेरिकेच्या सुवर्णयुगाची सुरूवात झाली आहे. आम्ही आमचे सार्वभौमत्व टिकवून ठेवा. जग आमचा वापर करू शकते. अमेरिकेत आता घुसखोरी होणार नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. माझे प्रिय मित्र राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राज्य अमेरिकेचे ४७वे राष्ट्राध्यक्षाच्या रूपात ऐतिहासिक शपथविधीसाठी खूप शुभेच्छा. मी पुन्हा एकदा एकत्र मिळून काम करण्यासाठी, दोन्ही देशांना लाभ पोहोचवण्यासाठी आणि जगाच्या चांगल्या भविष्याला आकार देण्यासाठी तत्पर आहे. आगामी यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…