Sunday, May 11, 2025

विदेशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Donald Trump Oath Ceremony: डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली राष्ट्राध्यक्षपदाची शपथ, बनले अमेरिकेचे ४७वे राष्ट्राध्यक्ष

Donald Trump Oath Ceremony: डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली राष्ट्राध्यक्षपदाची शपथ,  बनले अमेरिकेचे ४७वे राष्ट्राध्यक्ष

वॉशिंग्टन:डोनाल्ड ट्रम्प यांनी आज अमेरिकेचे ४७वे राष्ट्राध्यक्ष  म्हणून शपथ घेतली. राष्ट्राध्यक्ष म्हणून हा त्यांचा दुसरा कार्यकाळ आहे. ट्रम्प यांच्यासोबत जेडी वेन्स यांनी उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. शपथविधी समारंभाआधी त्यांनी अर्लिंग्टन नॅशनल सेमेट्रीमध्ये सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. ज्या जवानांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्या बहादूर जवानांच्या सन्मानासाठी आयोजित केला जाणारा हा सोहळा असतो. ही परंपरा नव्या राष्ट्राध्यक्षांसाठी महत्त्वाची असते. तसेच देशाच्या प्रती त्यांचा सन्मान दिसतो.


 


अमेरिकेत कडाक्याची थंडी असल्याने संसदेच्या आत शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी अनेक दिग्गज आले होते. यात फेसबुकचे फाऊंडर मार्क झुकरबर्ग, अॅमेझॉनचे फाऊंडर जेफ बेजोस आणि एलॉन मस्क यांचा समावेश आहे.



अमेरिकेच्या सुवर्णयुगाची सुरूवात


डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर आपल्या पहिल्या भाषणात म्हटले की, अमेरिकेच्या सुवर्णयुगाची सुरूवात झाली आहे. आम्ही आमचे सार्वभौमत्व टिकवून ठेवा. जग आमचा वापर करू शकते. अमेरिकेत आता घुसखोरी होणार नाही.

 


पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा


डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. माझे प्रिय मित्र राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राज्य अमेरिकेचे ४७वे राष्ट्राध्यक्षाच्या रूपात ऐतिहासिक शपथविधीसाठी खूप शुभेच्छा. मी पुन्हा एकदा एकत्र मिळून काम करण्यासाठी, दोन्ही देशांना लाभ पोहोचवण्यासाठी आणि जगाच्या चांगल्या भविष्याला आकार देण्यासाठी तत्पर आहे. आगामी यशस्वी कारकि‍र्दीसाठी शुभेच्छा
Comments
Add Comment