Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Elephants on Winter Vacation : महाराष्ट्रात हत्तींना हिवाळी सुट्टी!

Elephants on Winter Vacation : महाराष्ट्रात हत्तींना हिवाळी सुट्टी!

गडचिरोली : मेळघाट किंवा गडचिरोली येथे पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील हत्तींना पुढील काही दिवस हिवाळी सुट्टीवर पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे याकाळात गडचिरोली येथे हत्ती पहायला जाणाऱ्यांना हत्ती न दिसण्याचा अंदाज दिला जात आहे. (Elephants on Winter Vacation)



गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथील सरकारी 'हत्ती छावणी' मध्ये सध्या नऊ हत्ती कार्यरत आहेत. बसंती, रूपा, अजित, मंगला, राणी, प्रियंका, गणेश, लक्ष्मी, कुसुम. तथापि, या नऊ हत्तींना २० जानेवारी ते २९ जानेवारी पर्यंत रजेवर पाठवण्यात येत आहे. त्यामुळे 'हत्ती छावणी' दहा दिवसांसाठी बंद राहणार आहे. तर दुसरीकडे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत कोळकास येथील हत्तींना १० जानेवारी ते २५ जानेवारी अशा १५ दिवसांच्या वैद्यकीय सुट्टीवर पाठवण्यात आले असून या काळात हत्ती सफारी बंद असणार आहे.



हत्तींच्या हिवाळी सुट्टीमागचे कारण काय?


हत्तींसाठी हा वार्षिक विशेष वैद्यकीय रजेचा काल असतो. जानेवारीच्या थंडीत त्यांच्या पायांना भेगा पडू नये यासाठी त्यांच्या पायांवर विशेष उपचार केले जाते. ज्याला चोपिंग असे म्हणतात. चोपिंगमध्ये हत्तींच्या पायांना ४० ते ४५ औषधी वनस्पतींचं मिश्रण लावण्यात येतं. दहा दिवस हत्ती डॉक्टरांच्या देखरेखी खाली असतात. त्यांच्या पायांना अधिकाधिक विश्रांती मिळावी असा उद्देश असल्याने त्यांना फारशी हालचाल करू दिलं जात नाही. शिवाय त्यांना कुठलंही काम करू दिलं जात नाही. याशिवाय, त्यांच्या प्रकृती संदर्भातील तपासणी, रक्त चाचणी वगैरे केल्या जातात. (Elephants on Winter Vacation)

Comments
Add Comment