साप्ताहिक राशिभविष्य, १९ ते २५ जानेवारी २०२५
![]() |
प्रवास कार्यसिद्ध होतीलमेष : या सप्ताहात आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली राहणार आहे. धन आगमन होऊ शकते. नेहमीच्या उत्पन्न मार्गांच्या व्यतिरिक्त अन्य मार्गांनीही उत्पन्न वाढू शकते. मात्र स्थायी संपत्ती, जमिनीचे व्यवहार इत्यादींमध्ये जागरूकता हवी. कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांवर सह्या करताना आधी ती कागदपत्रे पूर्णपणे वाचून त्यावर सह्या करा. वडिलोपार्जित संपत्तीबद्दलचे वाद-विवाद संपुष्टात येतील. भावंडांशी चांगले संबंध राखा. कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. काहींना प्रवासाचे योग आहेत. नोकरी, व्यवसाय, धंदा यानिमित्य प्रवास करावे लागतील. प्रवास कार्यसिद्ध होतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. मुला-मुलींकडून सुखद वार्ता मिळतील. |
![]() |
धंद्यातील उलाढाल वाढेलवृषभ : एकूण या सप्ताहात प्रगती, उन्नती होऊ शकेल. विशेषतः नोकरदारांसाठी हा काळ अनुकूल ठरेल. स्वतःच्या अधिकारांमध्ये वाढ होईल. तसेच पदोन्नती अथवा वेतन वृद्धीसारख्या घटना घडू शकतात. सरकारी नोकरीमध्ये अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागेल. आपल्या अधिकार कक्षा जाणून घेऊन आपले कार्य पूर्ण करणे हितकारक ठरेल. व्यवसाय-धंद्यातील उलाढाल वाढेल. लहान-मोठी प्रलोभने टाळा. वस्तुस्थितीचे भान ठेवणे गरजेचे ठरेल. कौटुंबिक सुख मिळेल. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. भावंड, आप्तेष्ट, नातेवाईक यांच्याशी असलेले वाद-विवाद संपुष्टात येतील. |
![]() |
गृहसौख्य चांगले राहीलमिथुन : आतापर्यंत आपल्या मनात असलेल्या चिंता मिटतील. मोकळा श्वास घ्याल. ताणतणावरहित वातावरणाचा लाभ मिळेल. एखादी महत्त्वाची घटना घडल्यामुळे मनावरील ताण नाहीसा होईल. इच्छापूर्ती होईल. मनासारख्या घटना घटित होत असलेल्या बघून आपल्या आत्मविश्वासात वाढ होईल. आपल्यासमोर ही कामे वेगाने पूर्ण कराल. जीवनसाथींचे सूर जुळतील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. महत्त्वाच्या कामात प्रथमतः अडचणी आल्यासारखा वाटतील. पण नंतर मात्र कामे मार्गी लागतील. स्थायी संपत्तीविषयक कामे होतील. नोकरीमध्ये दगदग कमी होईल. गृहसौख्य चांगले राहील. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण कराल. समाधान मिळेल. |
![]() |
सुखद क्षण अनुभवालकर्क : या आठवड्यात नशिबाची साथ मिळेल. ग्रहमान आपल्या बाजूने आहे. जीवनसाथीची आपल्याला उत्तम साथ राहील. कौटुंबिक सुख मिळेल. कुटुंबामध्ये सुवार्ता मिळतील. कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह निश्चित होतील. धावपळीचे वातावरण तयार होईल. कुटुंबातले सर्व सदस्यांचे सहकार्य मिळवू शकाल. आर्थिक आवक चांगली राहील. त्याचबरोबर खर्चाचे प्रमाण वाढेल. आपले कार्यक्षेत्र, आपल्या अधिकारात वाढ होईल. आर्थिक फायदा होऊ शकतो. भावंडांबरोबर सुखद क्षण अनुभवाल. सहकारी तसेच वरिष्ठांचे अपेक्षित सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. काळजी दूर होईल. |
![]() |
धनलाभसिंह : आर्थिक स्थिती चांगली राहील. विविध मार्गांनी धनलाभ होऊ शकतो. त्यामुळे खर्च पण मुक्त हस्ते कराल. स्थायी संपत्ती, जमिनीची अडलेली कामे पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करतील. ओळखी मध्यस्थीचा फायदा होईल. आर्थिक फायदा मिळेल. अडलेली कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. सरकारी कामे होतील. वारसा हक्काची कामे सुरळीतपणे होतील. कुटुंबामध्ये जीवनसाथीशी वादविवाद नको. ज्येष्ठांचे मत विचारात घेतल्यास फायद्यात राहाल. नोकरीमध्ये बदलीची शक्यता आहे. त्याचा थोडासा ताण मात्र मनावर राहील; परंतु वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळू शकते. |
![]() |
बदल स्वीकारावे लागतीलकन्या : आपल्या आजूबाजूला अनुकूलता भरलेली अनुभवता येईल. अनुकूल घटना घडून येतील. ग्रहमानाची आपल्याला उत्तम साथ मिळेल. काही कारणानिमित्त प्रवास करावे लागतील. नोकरीच्या ठिकाणी काही बदल घडू शकतात. स्थान बदल अथवा कामातील बदल स्वीकारावे लागतील. वरिष्ठांच्या मताला प्राधान्य देणे हितकारक ठरेल. तसेच राजकारण आणि गटबाजीपासून अलिप्त राहणे गरजेचे. गृहसौख्य चांगले राहील; परंतु स्वतःच्या मताला सीमित ठेवा. आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा झालेली दिसेल. |
![]() |
कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी मिळू शकताततूळ : भाग्यश्री चांगली साथ राहील. काहींना प्रवास करावे लागतील. प्रवासामध्ये अति आत्मविश्वास टाळावा. तसेच नको तिथे साहस दर्शवू नका. नुकसान होण्याची शक्यता. आरोग्य चांगले राहील; परंतु प्रवासामध्ये खाणे-पिणे सांभाळा. नोकरीमध्ये बदल करायचा झाल्यास त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले सफल होऊ शकतात मात्र नवीन जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागेल. स्थान बदलही होऊ शकतो. खेळाडू व कलाकार यांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी मिळू शकतात. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल, पण खर्चही तेवढेच वाढलेले राहतील. धार्मिक कार्यक्रमांमध्ये पुढाकार घ्याल. |
![]() |
अधिकार क्षेत्र वाढेलवृश्चिक : या आठवड्यात आपल्याला भाग्याची चांगलीच साथ मिळेल. मनावरचा ताण कमी होईल. ताणतणावरहित वातावरणाचा लाभ घेऊ शकाल. सहकुटुंब, सहपरिवार अथवा मित्रमंडळ यांच्यासमवेत प्रवास घडू शकतात मात्र प्रवासात दगदग करू नका. त्याचप्रमाणे प्रवासामध्ये आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेऊन गाडीच्या वेगावर नियंत्रण असणे आवश्यक ठरेल. अतिआत्मविश्वास टाळा. आर्थिक स्थिती मजबूत राहील. नोकरीमध्ये अनुकूलता लाभून अधिकार क्षेत्र वाढेल. पैशाची आवक मनासारखी राहिल्यामुळे मनसोक्त खर्च करण्याकडे कल राहील. |
![]() |
समन्वय साधाधनू : या सप्ताहात ग्रहमान संमिश्र असल्यामुळे त्याची फलप्राप्ती सुद्धा संमिश्र होईल. काही गोड तर काही कडू अनुभव येतील. मनावर थोडा संयम ठेवणे आवश्यक राहील. जीवनसाथीची आपल्याला चांगली साथ मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात काही वेळा कामांमध्ये अडथळा आल्यामुळे आपला स्वभाव चिडचिडा होण्याची शक्यता आहे. आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवा. तसेच आपल्या बोलण्यावर आणि वर्तणुकीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे. कोणाचाही अपमान करू नका. समन्वय साधल्याने बरीच कामे होतील. |
![]() |
जबाबदारी एक आव्हान म्हणून स्वीकारामकर : या आठवड्यात आपल्या परिश्रमाला यशाची झालर प्राप्त होऊ शकेल. नवीन संधी बहुतेक क्षेत्रातून आपल्याला मिळतील. त्याचे सोने करणे आपल्याच हातात आहे. मनाप्रमाणे परिणाम कधी कधी न साधल्यामुळे मनस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रयत्नात सातत्य हवे. विद्यार्थ्यांनी आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित करणे हितकारक ठरेल. कुसंगत टाळा. नोकरीमध्ये दिलासा मिळेल. नवीन जबाबदाऱ्या एक आव्हान म्हणून स्वीकारल्यास त्याचा भविष्यात आपल्याला नक्कीच फायदा होईल. सरकारी नियमांचे पालन कटाक्षाने करणे हितकारक ठरेल. नकारात्मक विचारांच्या व्यक्तींच्या सहवासात राहू नका. |
![]() |
आत्मविश्वास वाढेलकुंभ : या सप्ताहात बऱ्याचशा घटना अनुकूल घडतील. आत्मविश्वास वाढेल. इतरांवर आपली मते लादू नका. दुसऱ्यांच्या मताला ही विचारात घ्या. विशेषतः नोकरीमध्ये वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. कोणावरही शेरेबाजी नको. राजकारण गटबाजीपासून अलिप्त राहा. व्यवसाय धंद्यात नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल. तसेच सरकारी नियम व कायदे यांचे पालन अवश्य करा. कामगारांचे सहकार्य लाभेल. काही महत्त्वाच्या कामांमध्ये अपेक्षित परिणाम न मिळाल्यामुळे आपल्या अगोदर क्रोधामध्ये वाढ होईल. त्यावर मात्र नियंत्रण ठेवा. आर्थिकदृष्ट्या चांगली परिस्थिती राहील. अचानक धनलाभाची शक्यता. स्वतःच्या मताला सीमित ठेवा. नाहीतर मनस्ताप होण्याची शक्यता. संयम ठेवणे गरजेचे राहील. |
![]() |
शांतपणे निर्णय घ्यामीन : अनुकूल सप्ताह असल्यामुळे त्याचा फायदा मिळेल. आपण पूर्वी केलेले नियोजन पूर्ण होत असलेले बघून समाधान मिळेल. मात्र परिस्थितीनुरूप त्यामध्ये काही बदल करावे लागतील. शांतपणे निर्णय घ्या. कामात थोडी धावपळ होऊ शकते. इतरांचे मत विचारात घ्या. त्याने कामे सुकर होतील. त्याचप्रमाणे कामाचा ताण जाणवू शकतो. व्यवसाय- धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील. नोकरीमध्ये काही चांगल्या वार्ता कानावर येतील. पदोन्नती अथवा वेतन वृद्धी मिळेल. कुटुंबांमधील मुलांना अपेक्षित यश मिळेल. चांगल्या संधी चालून येतील. स्वतःच्या तब्येतीकडे मात्र लक्ष द्या. कौटुंबिक सुख मिळेल. नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या गाठीभेटी होतील. |