

मुंबई : दहावी बारावीच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या या परीक्षा करियरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या मानल्या ...
सैफ अली खानवरील हल्ल्याचा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद याच्याकडे भारतीय असल्याचे ठोस पुरावे नाहीत. यामुळे तो बांगलादेशी असल्याचा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केली. आरोपी बांगलादेशी असावा असा संशय निर्माण करणारे काही पुरावे पोलिसांनी जप्त केले आहेत. पण तपास सुरू असल्यामुळे या विषयावर अधिक माहिती देणे योग्य होणार नाही; असे मुंबई पोलिसांनी सांगितले. आरोपी भारतात विजय दास (बिजॉय दास) या नावाने वावरत होता. काही दिवस मुंबईत आणि नंतर मुंबई जवळच्या भागात तो वास्तव्यास होता. तो एका हाऊसकिपिंग कंपनीत बनावट कागदपत्रे दाखवून नोकरी करत होता.

गडचिरोली : मेळघाट किंवा गडचिरोली येथे पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील हत्तींना पुढील काही दिवस ...
आरोपीला पोलिसांनी ठाण्यातून पकडले. त्याने सैफवर हल्ला केल्याची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी आरोपीला मुंबईत आणले असून त्याची चौकशी सुरू आहे. पुढील काही तासांत आरोपीला न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर करुन पोलीस कोठडीची मागणी केली जाईल, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. आरोपीने चोरीच्या उद्देशानेच सैफच्या घरात घुसखोरी केली होती. पण घरात विरोध झाला आणि आरोपीने चाकूने हल्ला केला; असे प्राथमिक चौकशीतून लक्षात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

नवी दिल्ली : भारताची स्टार नेमबाज मनू भाकरवर (Manu Bhaker) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मनू भाकरचे मामा आणि आजीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. हरियाणातील ...
मुंबई पोलिसांनी ठाणे पोलिसांच्या सहकार्याने कासारवडवली येथील हिरानंदानी इस्टेटच्या मागे असलेल्या झुडपातून आरोपीला पकडले. आरोपी हिरानंदानी इस्टेटमधील टीसीएस कॉल सेंटरच्या मागे असलेल्या मेट्रो बांधकाम स्थळाजवळील कामगार छावणीनजीकच्या झुडुपांमध्ये लपला होता. मोहम्मद ठाण्यातील 'रिकीज' बारमध्ये हाऊसकीपिंग कामगार म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याआधी तो एका पबमध्ये काम करत होता.

नवी दिल्ली : भारताचा महिला आणि पुरुष संघ खो खो विश्वचषकाच्या फायनलमध्ये अर्थात अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारताच्या महिला आणि पुरुष संघाने खो खो ...
'मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद बांगलादेशी नाही'
मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद बांगलादेशी नाही, असा दावा त्याचे वकील संदीप शेखणे (Sandeep Shekhane) यांनी केला आहे. रविवारी झालेल्या सुनावणीवेळी पोलिसांनी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद बांगलादेशी असल्याचा एकही पुरावा सादर केलेला नाही; असेही संदीप शेखणे म्हणाले.