Tuesday, November 4, 2025

चांदोबाच्या देशात : कविता आणि काव्यकोडी

चांदोबाच्या देशात : कविता आणि काव्यकोडी
झाडावर चढू, आकाशात उडू ढगांच्या गादीवर, धपकन पडू मऊ मऊ ढगांवर, घडीभर लोळू चमचम चांदण्याशी, लपाछपी खेळू पळणाऱ्या चांदोबाच्या, मागे मागे धावू चांदण्यांच्या पंक्तीला, पोटभर जेवू चांदोबाशी गोडीनं, खूप खूप बोलू घरातल्या गमती, सांगत चालू चालून चालून, दुखतील पाय चांदोबा बोलेल मला, “दमलास काय? बस माझ्या पाठीवर, फिरायला जाऊ आकाशगंगा जरा, जवळून पाहू” चांदोबाच्या पाठीवर, पटकन बसू आकाशात फिरताना, ताऱ्यांसारखं हसू

काव्यकोडी - एकनाथ आव्हाड

१)जीवनलहरी, विशाखा वादळवेल, छंदोमयी काव्यामृताचा आस्वाद कविता यांची देई पृथ्वीचे प्रेमगीत त्यांनीच खरे गायले नटसम्राट नाटक कोणी बरं लिहिले ? २) साप दिसताच म्हणतात बापरे ! रडला कुणी की म्हणतात अरेरे! भावनांच्या रसात बुडून उभे राही कोणते हे चिन्ह लिखाणात येई? ३) तीन कोनांचा होई त्रिकोण चार कोनांचा अर्थात चौकोन पाच कोनांच्याला पंचकोन म्हणतो सहा कोनांच्याचं नाव काय सांगतो ? उत्तर - १) कुसुमाग्रज २) उद्गारवाचक चिन्ह ३) षटकोन
Comments
Add Comment