मुंबई: ज्योतिषशास्त्रात सकाळी सकाळी काही गोष्टी दिसणे शुभ मानले जाते. असे म्हणतात की या गोष्टी सकाळी दिसल्यास काहीतरी शुभ वार्ता मिळणार आहे. जाणून घेऊया अशाच काही गोष्टींबद्दल ज्या पाहिल्याने सुख-समृद्धी वाढते.
जर झोपेतून उठल्यावर तुम्हाला देवाची मूर्ती, शंख दिसला अथवा मंदिराच्या घंटेचा आवाज ऐकू आला तर हे शुभ मानले जाते.
सकाळी सकाळी उठल्यावर घराच्या दरवाजावर सफेद गाय दिसणेही अतिशय उत्तम मानले जाते. यामुळे मनुष्याच्या सुख-संपन्नतेत वाढ होते.
सकाळी उठताच तुम्हाला जर दूध, दही दिसत असेल तर हे येणाऱ्या काळात चांगल्या नशिबाच्या दिशेने इशारा करते.
सकाळी जर घराच्या छतावर अथवा अंगणात पक्षी दिसत असेल तर समजून जा की तुम्हाला लवकरच शुभ बातमी मिळणार आहे.
सकाळच्या वेळेस सफेद फूल, अथवा जवळचा मित्र अथवा हत्ती दिसणेही उत्तम मानले जाते. या संकेतांकडे कधीही दुर्लक्ष करू नका.
याशिवाय हस्तरेखा शास्त्रानुसार हातांमध्ये दैवी शक्तींचा वास असतो. त्यामुळे सकाळी सकाळी हाताकडे पाहणेही शुभ मानले जाते.