

सैफ अली खानवर चाकूहल्ला करणाऱ्याला पोलीस कोठडी
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर १६ जानेवारी रोजी मध्यरात्री चाकूहल्ला झाला. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद (Mohammad ...
चेक बाऊन्स झाल्यामुळे बँकिंग क्षेत्राशी संबंधित नियमांतर्गत शाकिब अल हसन विरोधात अटक वॉरंट निघाले आहे. न्यायालयाने शाकिब अल हसन विरोधात अटक वॉरंट काढले आहे. क्रिकेटमध्ये उत्तम कारकिर्द असलेल्या शाकिब अल हसनचे वैयक्तिक आयुष्यातले वर्तन अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ताज्या चेक बाऊन्स प्रकरणामुळे शाकिब अल हसन अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

HSC-SSC Exam Update : वाद झाल्यानंतर हॉलतिकिटांवरून काढून टाकले जातीचे उल्लेख!
मुंबई : दहावी बारावीच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या या परीक्षा करियरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या मानल्या ...
बांगलादेशच्या शाकिब अल हसनने ७१ कसोटी सामन्यात ४,६०९ धावा केल्या आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पाच शतके आणि ३१ अर्धशतके झळकावली आहेत. कसोटीत एका डावात फलंदाजी करताना शाकीबने २१७ धावा ही वैयक्तिक सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २४७ सामने खेळत ७,५७० धावा केल्या आहेत. यात त्याने केलेल्या नऊ शतकांचा आणि ५६ अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये नाबाद १३४ धावा ही शाकीबची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे. शाकीबने १२९ आंतरराष्ट्रीय टी - ट्वेंटी सामने खेळून २५५१ धावा केल्या आहेत. त्याने टी - ट्वेंटीमध्ये १३ अर्धशतके झळकावली आहेत.

Elephants on Winter Vacation : महाराष्ट्रात हत्तींना हिवाळी सुट्टी!
गडचिरोली : मेळघाट किंवा गडचिरोली येथे पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील हत्तींना पुढील काही दिवस ...
शाकीबने कसोटी क्रिकेटमध्ये २४६, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३१७ आणि टी - ट्वेंटीमध्ये १४९ बळी घेतले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये शाकीबने १९ वेळा एका डावात पाच बळी घेण्याची किमया केली आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये चार वेळा आणि टी - ट्वेंटीमध्ये दोन वेळा एका डावात पाच बळी घेण्याची किमया केली आहे. शाकीबने दोन आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात दहा बळी घेण्याची किमया साधली आहे.