मुंबई: एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान्स मिळतात. कंपनी काही खास प्लान्स ऑफरही करते ज्यात अनेक फायदे मिळत नाहीत. जर तुम्हाला लाँग टर्म प्लान हवा आहे तर कंपनीने एक खास ऑफर आणली आहे. असाच एक प्लान १९९९ रूपयांचा आहे. हा एक चांगला पर्याय आहे.
१९९९ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये ग्राहकांना एक वर्षे म्हणजेच ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या प्लानमध्ये डेटा कॉलिंग आणि इतर फायदेही मिळतात. यात युजर्सला २४ जीबी डेटा संपूर्ण व्हॅलिडिटीसह मिळतो. यात तुम्हाला अनलिमिटेड लोकल, एसटिडी आणि रोमिंग कॉलिंगची सुविधाही मिळते. कॉलिंग आणि डेटा व्यक्तिरित्त या प्लानमध्ये युजर्सला १०० एसएमएस प्रति दिवस मिळता. सोबतच युजर्सला स्पॅम प्रोटेक्शनचीही सुविधा मिळते.
रिचार्ज प्लानमध्ये अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास यात एअरटेल एक्स्ट्रीम अॅपचे सबस्क्रिप्शनही मिळते. दरम्यान, प्रिमियम अॅक्सेस मिळत नाही.
याशिवाय कंपनी अपोलो २४ बाय ७ सर्कल तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन ऑफर करते. तुम्ही फ्री हॅलो ट्यूनचाही फायदा उचलू शकता. तुम्हाला दीर्घकाळ चालणारा प्लान हवा असेल तर हा रिचार्ज प्लान चांगला आहे. यात तुम्हाला एका वर्षाची व्हॅलिडिटी मिळते.