मुंबई : सलग नऊ वेळा विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलेल्या आमदार कालिदास कोळंबकर यांनी विश्वविक्रमाची नोंद केली आहे. वर्ल्ड रेकॉर्डस् बूक ऑफ इंडिया या संस्थेने विश्वविक्रम धारक म्हणून आमदार कालिदास कोळंबकर यांची नोंद केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदार कालिदास कोळंबकरांचा पदक आणि गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी वर्ल्ड रेकॉर्डस् बूक ऑफ इंडिया संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Guardian Minister यादी जाहीर! नितेश राणेंकडे सिंधुदुर्गचे पालकमंत्रिपद तर मुंडेंना डच्चू
मुंबई : अखेर महाराष्ट्राच्या पालकमंत्री पदाची (Guardian Minister) नावे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहेत. यात सिंधुदुर्गचे पालकमंत्रिपद नितेश राणेंकडे (Nitesh ...
दिवंगत आमदार गणपतराव देशमुख सोलापूरच्या सांगोल्यातून १० वेळा विजयी झाले होते. पण त्यांना हे विजय सलग मिळवता आलेले नाहीत. या उलट कालिदास कोळंबकर यांनी सलग नऊ वेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. शिवसेनेतून राजकीय प्रवास सुरु करणाऱ्या कोळंबकर यांनी २००५ मध्ये नारायण राणेंसोबत सेना सोडली. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. २०१९ मध्ये ते भाजपकडून निवडून आले. यानंतर २०२४ मध्ये पुन्हा एकदा ते भाजपाकडून निवडून आले.
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा अर्ज मागे कसा घ्यावा ?
मुंबई : विधानसभा निवडणूक २०२४ च्या आधी आणि नंतरही महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय झालेली आणि देशभर चर्चेचा विषय ठरलेली लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे. ...
वडाळा मतदारसंघात मराठी मतदारांचं प्रमाण लक्षणीय आहे. याशिवाय मुस्लिम, पारशी, दलित मतदारांची संख्याही बऱ्यापैकी आहे. कोळंबकर यांनी पहिल्यांदा शिवसेनेतून विधानसभेची निवडणूक लढवली. १९९० मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. तेव्हापासून ते अपराजित आहेत. तेव्हा ते नायगाव मतदारसंघातून विजयी झाले होते. २००९ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली. तेव्हापासून कोळंबकर वडाळ्यातून विजयी होत आले आहेत.