पालघर : आर्थिकदृष्ट्या मागास आणि वंचित घटकांतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी खासगी शाळांमध्ये आरटीईअंतर्गत (RTE) २५ टक्के मोफत प्रवेश दिला जातो. यावर्षी सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्राकरिता जिल्ह्यातील २७२ शाळांनी नोंदणी केली असून, त्या शाळांअंतर्गत ५०७२ विद्यार्थ्यांना पहिलीत मोफत प्रवेश (School Admission) दिला जाणार आहे. यासाठी १४ जानेवारीपासून ऑनलाइन नोंदणीस सुरुवात झाली असून बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात.
PM Surya Ghar Yojana : सौर ऊर्जा प्रकल्प ठरतोय लाभदायक; वीजनिर्मितीमुळे २,४४८ ग्राहक झाले स्वावलंबी!
ऑनलाइन अर्ज करण्यास २७ जानेवारीपर्यंत मुदत
‘आरटीई’ अंतर्गत पहिली आणि नर्सरीकरिता प्रवेश दिला जातो. यामध्ये एकूण २७२ शाळांमधून ५०७२ विद्यार्थ्यांना पहिलीत प्रवेश दिला जाणार आहे, तर डहाणूमधील ६३ आणि जव्हारमधील ७ अशा एकूण ७० विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक म्हणजेच नर्सरीमध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे. या प्रवेशांकरिता ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. आता पालकांना बालकांचा ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी १४ ते २७ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
पालकांनी या मुदतीत आपल्या पाल्याचा अर्ज करणे आवश्यक आहे. त्यानंतर एकाच ठिकाणाहून सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला सुरुवात होणार आहे. तालुका डहाणू १५ शाळा जागा, जव्हार ३ शाळा ३७ जागा, पालघर ६९ शाळा ९१७ जागा, तलासरी १२ शाळा ११४ जागा, वसई १५३ शाळा ३६३७ जागा, विक्रमगड ७ शाळा ५८ जागा, वाडा १३ शाळा १४५ जागा अशा प्रकारचे शाळा आणि प्रवेश संख्यांच स्वरूप आहे. (School Admission)