Thursday, May 8, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या नियमात होणार बदल!

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या नियमात होणार बदल!

मुंबई : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबाबत (PM Kisan Yojana) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पीएम किसान योजनेत पारदर्शकता यायला हवी. तसेच खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्याला या योजनेचा फायदा घेता यावा. यासाठी केंद्र सरकारने या योजनेच्या नियमात बदल केला असेल असं मला वाटतं, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यामुळं आता केंद्र सरकारनं नेमका पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत कोणता बदल केला असेल? अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे.


पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत ४ महिन्याला २००० रुपयांचा हप्ता या प्रमाणे दिली जाते. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना जीएम किसान योजनेचे १८ हप्ते मिळाले आहेत. १९ वा हप्ता कधी मिळणार अशी देखील मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. लवकरच म्हणजे पुढच्या फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता मिळणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत कोणताही माहिती मिळाली नाही. मात्र, अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. केंद्र सरकारने या योजनेच्या नियमात बदल केला असेल असं मला वाटतं असे एकनाथ शिंदे म्हणाले.


राज्यात जिथे जिथे विकासाची आवशकता आहे तिथे तिथे आम्ही विकास करु या विशस्वासाने लोक येत आहेत असे शिंदे म्हणाले. आजचं स्वामीत्व योजना जाहीर केली आहे. सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम मोदी करत आहेत. आज ६५ लाख लोकांना लाभ मिळाला असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. पीएम किसान योजनेत पारदर्शकता यायला हवी, खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्याला या योजनेचा फायदा घेता यावा, प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा फायदा घेता यावा यासाठी केंद्राने नियमात बदल केला असेल असं मला वाटत असेही शिंदे म्हणाले. विचारांशी तडजोड आणि बाळासाहेबांचे विचार सोडल्याने उबाठाची लोक येत आहेत. जिथे जिथे स्थानिक स्वराज्य संस्थांनाच्या निवडणुका आहेत तिथे तिथे आम्ही महायुती म्हणून निवडणुका लढवणार आहोत. काही ठिकाणी परिस्थिती नुसार कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेतला जाईल असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Comments
Add Comment