Monday, February 17, 2025
Homeब्रेकिंग न्यूजसैफ अली खानवर चाकूहल्ला, छत्तीसगडमधून एकाला पकडले

सैफ अली खानवर चाकूहल्ला, छत्तीसगडमधून एकाला पकडले

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (५४) याच्यावर झालेल्या चाकूहल्ला प्रकरणी एका संशयिताला छत्तीसगडमधून आणि एका संशयिताला मध्य प्रदेशातील एका रेल्वे स्थानकावरुन ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांचा ताबा मुंबई पोलिसांना लवकरच दिला जाईल.

राष्ट्रवादीच्या आमदाराची घरवापसी

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकाश कैलाश कन्नोजिया नावाच्या ३१ वर्षांच्या संशयिताला छत्तीसगडमधील दुर्ग रेल्वे स्थानकावरुन ताब्यात घेण्यात आले आहे. तो मुंबई-हावडा ज्ञानेश्वरी एक्सप्रेसने दुर्ग येथे आला होता.

चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे नातू किरण फाळके यांचे निधन

सैफ अली खान याच्या वांद्रे येथील घरात मध्यरात्री घुसखोरी झाली. आवाज ऐकून जागा झालेल्या सैफने घुसखोरी करणाऱ्याला विरोध केला. यावेळी झालेल्या संघर्षात दरोडेखोराने चाकूहल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला. सैफला सहा जखमा झाल्या, यापैकी दोन जखमा गंभीर स्वरुपाच्या होत्या. सैफला जखमी केल्यानंतर चाकूहल्ला करणारा पळून गेला. जखमी झालेल्या सैफला वांद्रे येथील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तातडीने उपचार झाले, दोन शस्त्रक्रिया झाल्या. यामुळे सैफ अली खान वाचला. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत सैफ अली खान लिलावती रुग्णालयात विश्रांती घेत आहे.

मुंबई पोलिसांनी सैफ अली खान राहतो त्या इमारतीचे सीसीटीव्ही फूटेज तपासले तसेच सैफच्या घरात काम करणाऱ्या नोकरांची चौकशी केली. यानंतर सैफवर हल्ला करणाऱ्याचा शोध सुरू झाला. तपास करणे सोपे व्हावे यासाठी सैफवर हल्ला करणाऱ्याचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी सार्वजनिक केले. या फूटेजच्या मदतीने शोध सुरू असतानाच छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांतून प्रत्येकी एका व्यक्तीला सैफ प्रकरणातील संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर १६ जानेवारी रोजी चाकूहल्ला झाला होता. या हल्ल्यात ५४ वर्षीय सैफला सहा जखमा झाल्या होत्या. यापैकी दोन जखमा गंभीर स्वरुपाच्या होत्या. वेळेत लिलावती रुग्णालयात उपचार मिळाल्यामुळे आता सैफची प्रकृती स्थिर आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -