Tuesday, May 20, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीसिंधुदुर्ग

Nilesh Rane : कुडाळ, मालवण आगारासाठी ४३ नवीन एसटी बसेस मिळाव्यात!

Nilesh Rane : कुडाळ, मालवण आगारासाठी ४३ नवीन एसटी बसेस मिळाव्यात!

आमदार निलेश राणे यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी


मालवण : कुडाळ व मालवण आगारासाठी ४३ नवीन एसटी बसेस मिळाव्यात, अशी मागणी आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्याकडे केली आहे.



दिलेल्या पत्रात म्हटले आहे, माझ्या मतदार संघातील राज्य परिवहन महामंडळाच्या कुडाळ व मालवण आगारातील अनेक बस नादुरुस्त असून यामुळे ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या रद्द करायची वेळ आली आहे. यामुळे शाळकरी मुले व नोकरीनिमित्त प्रवास करणारे नागरीक, महिला, वृद्ध यांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे.


तरी सदरील प्रश्नांचा गांभीर्यपूर्वक विचार करत माझ्या मतदार संघातील कुडाळ आगारासाठी किमान २५ तर मालवण आगारासाठी किमान १८ अशा एकूण ४३ नविन एसटी बस उपलब्ध करून देऊन सहकार्य करावे, अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.

Comments
Add Comment