Friday, May 9, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी

राष्ट्रवादीच्या आमदाराची घरवापसी

राष्ट्रवादीच्या आमदाराची घरवापसी
शिर्डी : विधानसभा निवडणुकीआधी अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत प्रवेश करणारे आमदार सतीश चव्हाण आता पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परतले आहेत. विधान परिषदेतील मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण शनिवारी शिर्डीतील मेळाव्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले. आमदार सतीश चव्हाणांची घरवापसी हा शरद पवारांच्या गटाला धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

आमदार सतीश चव्हाण यांनी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकारच्या विरोधात प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने पक्षविरोधी भूमिका घेतली. यामुळे त्यांना सहा महिन्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले. पण सतीश चव्हाण यांनी १३ जानेवारी २०२५ रोजी शरद पवारांच्या नेतृत्वातील पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अखेर शनिवारी १८ जानेवारी २०२५ रोजी विधान परिषदेतील मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सतीश चव्हाण हे २००८ पासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे विधान परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
Comments
Add Comment