मुंबई : बॉलिवू़ड मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर येतेय. ती म्हणजे अशी की ‘मेरे हसबंड की बीवी’ चित्रपटाच्या सेटवर शूटिंगदरम्यान मोठी दुर्घटना झालीय. चित्रपटाच्या सेटवर अचानक छत कोसळल्याने खळबळजनक वातावरण निर्माण झालंय. यावेळी सेटवर अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर, जॅकी भगनानी आणि चित्रपटाचे दिग्दर्शक मुदस्सर अजीज उपस्थित होते. या दुर्घटनेत सुदैवाने कोणाला गंभीर दुखापत झाली नाहीये.
‘मेरे हसबंड की बिवी’ या चित्रपटाचं मुंबई येथील रॉयल पाम्स इंपेरिअल पॅलेसमध्ये शूटिंग सुरु होतं. त्यावेळी चित्रपटाच्या सेटवर अचानक छत कोसळलं. शूटिंगदरम्यान मोठा आवाज आल्याने छत कोसळल्याची ही दुर्घटना घडली. यामुळे अर्जुन, भूमी, जॅकी आणि दिग्दर्शक मुदस्सर यांना किरकोळ जखम झाल्याचं पाहायला मिळतंय. या चित्रपटाचं अनेक दिवसांपासून मोठ्या आवाजात इथे शूटिंग होत असल्याने ही दुर्घटना घडली असल्याचं बोललं जातंय.
Nilesh Rane : कुडाळ, मालवण आगारासाठी ४३ नवीन एसटी बसेस मिळाव्यात!
नेमकं काय झालं?
‘मेरे हसबंड की बिवी’ या चित्रपटाच्या गाण्याचं शूटिंग सुरु होतं. पहिल्या दिवशी शूटिंग व्यवस्थित झालं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६ वाजता एका सीनच्या शूटिंगदरम्यान छत अचानक कोसळलं. या सेटवरच्या छतचे तुकडे कोसळल्याने वेळीच सर्वांनी बचाव केला. जर संपूर्ण छत कोसळलं असतं तर मोठी दुर्घटना घडली असती. परंतु तरीही अनेकांना दुखापत झाली. ‘मेरे हसबंड की बिवी’ हा चित्रपट २१ फेब्रुवारी २०२५ ला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.