आरजी कर प्रकरणात संजय रॉय दोषी, उद्या शिक्षा
नवी दिल्ली : उत्तर कोलकाता येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आरजी कार येथे ९ ऑगस्ट २०२४ रोजी एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा मृतदेह आढळून (Kolkata Rape Case) आला. या प्रकरणामुळे देशात खळबळ उडाली होती. या घटनेच्या तपासादरम्यान आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या झाल्याचे उघडकीस आले. या हत्येप्रकरणी सियालदह न्यायालयाने संजय रॉय याला दोषी ठरवण्यात आले असून उद्या आरोपीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. त्यामुळे अखेर १६१ दिवसानंतर कोलकाता प्रकरणातील निर्भयाला न्याय मिळणार आहे.
PM Narendra Modi : पंतप्रधानांच्या हस्ते स्वामित्व योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्डचे वितरण!
कोलकाता (Kolkata) खून प्रकरणी आज सियालदह न्यायालयाने मुख्य आरोपी संजय रॉय याला दोषी ठरवले. त्याला सोमवारी २० जानेवारी रोजी शिक्षा सुनावली जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. या खटल्याच्या ५७ दिवसांनंतर सियालदह अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिर्बान दास यांच्या न्यायालयाने निकाल दिला. दरम्यान, निकाल सुनावणीवेळी मुख्य आरोपी संजय रॉय याला न्यायालयात आणले होते. निकालानंतर संजय रॉयला यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
याधीश अनिर्बन दास यांनी संजय रॉयला भारतीय न्यायिक संहितेच्या कलम ६४ (बलात्काराची शिक्षा), ६६ (मृत्यूला कारणीभूत ठरण्याची शिक्षा) आणि १०३ (हत्या) नुसार दोषी ठरवले. सियालदह न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिर्बन दास यांनी खटला सुरू झाल्यानंतर १६१ दिवसांनी हा निकाल दिला. संजय रॉयला दोषी ठरवताना न्यायमूर्तींनी ‘तुला शिक्षा झालीच पाहिजे’, असे मत व्यक्त केले.
संजयने न्यायाधीशांना विचारले की, मला गोवण्यात आलेल्या इतर लोकांना का सोडले जात आहे?, याला उत्तर देताना न्यायाधीश अनिर्बन दास म्हणाले, ‘मी सर्व पुरावे काळजीपूर्वक तपासले आहेत आणि साक्षीदारांचे म्हणणे ऐकले आहे आणि खटल्यादरम्यान युक्तिवादही ऐकले आहेत. या सगळ्यातून गेल्यावर मी तुला दोषी ठरवले आहे. तुम्ही दोषी आहात. तुला शिक्षा झालीच पाहिजे. (Kolkata Rape Case)
नेमके प्रकरण काय?
आरजीच्या बहाण्याने तो मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार रूममध्ये गेला. तिथे आराम करत असलेल्या महिला डॉक्टरवर बलात्कार करून मारहाण करून तिची हत्या केली, अशी तक्रार आरोपीविरुद्ध आहे. शवविच्छेदन अहवालात आरोपीने आधी पीडितेवर बलात्कार केला आणि नंतर तिची गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. तिच्या मृत्यूची पुष्टी करण्यासाठी आरोपीने तिचा दोनदा गळा दाबून खून केला होता.
संपूर्ण खटल्याची सुनावणी इन- कॅमेरा सुनावणी
संपूर्ण खटल्याची सुनावणी इन- कॅमेरा आणि बंद कोर्टरुममध्ये घेण्यात आली. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान एकूण ५० साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. यात पीडितेचे पालक, सीबीआय, कोलकाता पोलिसांतील तपास अधिकारी, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि काही डॉक्टर आणि पीडितेचे सहकारी यांचा समावेश होता.