
बीड : मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. देशमुख हत्याकांडातील मास्टर माईंड असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लागला आहे. दरम्यान त्याच्या वकिलांनी केज न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. आज केज न्यायालयात त्याबाबत सुनावणी होणार आहे.

मुंबई : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या ...
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडात आरोपी असलेल्या सगळ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जवाब नोंदवण्यात आला आहे. या हत्याकांडातील मकोका लागलेल्या मास्टर माईंड असलेल्या वाल्मिक कराडला मकर संक्रांतीच्या दिवशी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच दिवशी त्याच्या वकिलांनी केज न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. आज केज न्यायालयात न्या. एस. व्ही. पावसकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.दरम्यान आता वाल्मिक कराडला जामीन मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.