Monday, October 20, 2025
Happy Diwali

वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर २० तारखेला सुनावणी

वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर २० तारखेला सुनावणी
बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीड न्यायालयाने वाल्मिक कराडला सात दिवसांची एसआयटी कोठडी ठोठावली आहे. या कोठडीची मुदत २२ जानेवारीपर्यंत आहे. ही मुदत संपण्याआधीच वाल्मिक कराडने जामीन मिळवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. त्याच्या जामीन अर्जावर सोमवारी २० जानेवारी रोजी केज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. या सुनावणीत काय होते याकडे अनेकांचे लक्ष आहे.
एसआयटीतर्फे तपास अधिकारी अनिल गुजर यांनी आज संपूर्ण तपासाची माहिती देत युक्तिवाद केला. वाल्मिक कराडने हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिल्याचा दावाही यावेळी करण्यात आला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता एसआयटीने १० दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने सात दिवसांची एसआयटी कोठडी दिली.
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्या ९ डिसेंबर रोजी झाली, त्यादिवशी दुपारी ३.२० ते ३.३० दरम्यान दहा मिनिटात सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचे फोनवरून संभाषण झाले. या दरम्यान तिघांमध्ये त्या दिवशी नेमकं काय बोलणं झाला याचा तपास एसआयटीला करायचा आहे. तसेच वाल्मिक कराडने हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिल्याचा मोठा दावाही एसआयटीकडून करण्यात आला आहे. विदेशातील मालमत्तेबाबत चौकशी सरकारी वकिलांकडून करण्यात आली आहे. यात विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यामध्ये काही परस्पर संबंध काय आहेत? याची माहिती घेण्यात आली. तसेच फरार आरोपी अजून सापडायचा आहे त्या कृष्णा आंधळे याला लपवण्यात यांचा हात आहे का? सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे हे गेले अनेक दिवस फरार होते. त्यांना कोणी मदत केली? अशा अनेक गोष्टींचा उलगडा तपास यंत्रणेला करायचा आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या, मकोका अंतर्गत या आठ जणांवर होणार कारवाई : सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतिक घुले, सिद्धार्थ सोनवणे, वाल्मिक कराड  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >