Saturday, April 19, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेचित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे नातू किरण फाळके यांचे निधन

चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे नातू किरण फाळके यांचे निधन

डोंबिवली : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे नातू अॅक्युपंक्चर थेरपिस्ट आणि गिटार वादक किरण फाळके यांचे शनिवारी पहाटे पाच वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिर येथील मोक्षधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंड असा परिवार आहे.

सैफ अली खान प्रकरणी संशयिताला घेतले ताब्यात

किरण फाळके मागील सहा दशकांपासून डोंबिवलीत वास्तव्यास होते. ते डोंबिवलीतील अनेक स्थित्यंतरांचे साक्षीदार होते. अनेकजण किरण फाळकेंना स्वच्छंदी आणि हसतमुख स्वभावाची व्यक्ती म्हणून ओळखत होते. त्यांनी अॅक्युपंक्चर थेरपिस्ट म्हणून ३५ वर्षे काम केले. अनेक गरजूंवर विनामूल्य उपचार केले. नुकतीच त्यांची भिवंडी येथील एका महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून नियुक्ती झाली होती. या क्षेत्रात अनेक विद्यार्थी त्यांनी घडविले. शेवटच्या श्वासापर्यंत ते कार्यरत होते.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर

गिटार वाजवणे हा त्यांचा छंद होता. की बोर्ड, साऊथ अर्बन, गिटार, हवाईयन गिटार अशी पाच – सहा वाद्ये वाजवण्यात ते निपुण होते. त्यांनी डिजिटल ऑडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून दोन सीडी तयार केल्या होत्या. तसेच बाईकवरुन डोंबिवली ते कन्याकुमारी आणि डोंबिवली ते पाकिस्तानची सीमा असे भारत भ्रमण केले होते. किरण फाळके यांच्या निधनाने डोंबिवलीतील एक अष्टपैलू व्यक्तीमत्व हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -