
अहमदाबाद : केंद्र सरकारने (Central Government) राज्यातील नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्याप्रमाणे केंद्र सरकारने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी स्वामित्व योजना (Svamitva Yojana) राबवली आहे. याअंतर्गत नागरिकांना प्रॉपर्टी कार्डद्वारे बँकेकडून कर्ज घेता येते सहज शक्य होत आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ६५ लाख प्रॉपर्टी कार्डचे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

आमदार निलेश राणे यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी मालवण : कुडाळ व मालवण आगारासाठी ४३ नवीन एसटी बसेस मिळाव्यात, अशी मागणी आमदार निलेश ...
यावेळी पीएम मोदी यांनी राजस्थान, मध्य प्रदेशातील या योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. 'आजचा दिवस देशातील गावे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी खूप ऐतिहासिक आहे. ५ वर्षापूर्वी स्वामित्व योजना योजना सुरू केली होती. जेणेकरुन गावांमध्ये राहणाऱ्या लोकांना कायदेशीर पुरावे मिळावा. गेल्या ५ वर्षात सुमारे दीड कोटी लोकांना स्वामित्य योजनेंतर्गत प्रॉपर्टी कार्डस देण्यात आली आहेत, आजच्या कार्यक्रमात ६५ लाखांहून अधिक कुटुंबांना स्वामित्व कार्ड मिळाली आहेत' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
ग्रामपंचायतींच्या अडचणी दूर होतील
आता प्रॉपर्टी हक्क मिळाल्याने ग्रामपंचायतीच्या अडचणी दूर होतील आणि त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. यामुळे आपत्तीच्या परिस्थितीत योग्य दावा मिळवणे देखील सोपे होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर ड्रोनच्या मदतीने देशातील प्रत्येक गावातील घरे आणि जमिनीचे मॅपिंग केले जाईल. गावकऱ्याऱ्यांना त्यांच्या निवासी मालमतेचे कागदपत्रे दिली जातील, असेही त्यांनी म्हटले.