Friday, February 14, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेMumbai Nashik Highway : मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव खाडी पुलाच्या दुभाजकाचा भाग कोसळला

Mumbai Nashik Highway : मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव खाडी पुलाच्या दुभाजकाचा भाग कोसळला

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव येथील खाडी पुलाच्या दुभाजकाचा काही भाग कोसळून खाली पडला. भगदाड पडलेल्या भागात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मार्गरोधक लावण्यात आले आहेत. तर, पुलावरील रस्ते मात्र सुस्थितीत असून या पुलावरील दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. तसेच या दुभाजकाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाच्या प्रशासनाकडून देण्यात आली.

उरण येथील जेएनपीटी बंदरातून नाशिक, गुजरात आणि भिवंडीच्या दिशेने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. ही वाहने मुंब्रा बाह्यवळण मार्गे मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव येथून नाशिक तसेच भिवंडी मार्गे वाहतूक करतात. काही वाहने भिवंडी मार्गे गुजरातच्या दिशेने जातात. याशिवाय, इतर खासगी वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. या मार्गावर एखादे वाहन बंद पडले किंवा अपघात झाला तर, या मार्गावर कोंडी होते आणि त्याचा परिणाम मुंबई महानगरातील इतर रस्त्यांवरही होतो. त्यामुळे हा मार्ग सर्वात महत्वाचा मानला जातो. तसेच या मार्गाला समृद्धी मार्ग जोडण्यात येणार असून त्यासाठी हा रस्ता रुंद करण्याचे काम सुरू आहे. खारेगाव खाडी पुल हा ३० ते ३५ वर्षे जुना झाला असून त्याच्या बाजूला नवी पुलांची उभारणी करण्यात येत आहे. हे काम झाल्यानंतर जुना पुलाच्या मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. असे असतानाच, शुक्रवारी रात्री खाडी पुलाच्या दुभाजकाचा काही भाग कोसळून खाली पडला. याठिकाणी नवीन खाडी पुलाचे काम करीत असलेल्या कामगारांनी हा प्रकार पाहून राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना त्याबद्धल कळविले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी धाव घेऊन भगदाड पडलेल्या भागात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मार्गरोधक लावले, अशी माहीती सुत्रांनी दिली.

Mahavitaran : रायगड जिल्ह्यात सौर ऊर्जेतून वीजनिर्मितीला चालना

पुलावरील रस्ते सुस्थितीत

या रस्त्यांवर दोन्ही बाजूची वाहने एकमेकांना धडकून अपघात होऊ नये यासाठी दुभाजक बसविण्यात आलेले असतात. तशाच प्रकारे खाडी पुलांच्या मधोमध काही अंतर सोडण्यात येतो. हा मोकळा भाग स्लॅब टाकून बंदीस्त करण्यात आलेला असतो. अशाचप्रकारे खारेगाव खाडी पुलावरील दुभाजक आहे. त्याचा काही भाग पडून तिथे मोठे भगदाड पडले आहे. या ठिकाणी अपघात होऊ नये यासाठी मार्गरोधक बसविण्यात आलेले आहेत. पुलावरील रस्ते सुस्थितीत असल्याने येथून वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाच्या प्रशासनाकडून देण्यात आली.

 

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -