कल्याण : कल्याण परिमंडल ३चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणमध्ये विशेष अंमली पदार्थ पथकाने नशेखोर आणि नशेचे पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाईचा जोरदार बडगा उगारला असून कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी परिसरात गांजा विक्री करणाऱ्या तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून २१८० ग्रॅम वाजनाचा ३२ हजार रु किंमतीचा गांजा जप्त केला आहे.
चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे नातू किरण फाळके यांचे निधन
कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी सीएनजी पंप जवळ सार्वजनिक रोड येथे भिवंडी येथील जिशान अक्तर शेख वय २३ वर्ष, नितीन हिम्मतभाई ओझा वय ५२ वर्ष, परवीन फिरोज शेख यांनी रिक्षामध्ये २१८० ग्रॅम वाजनाचा ३२ हजार रु किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ विक्रीकरिता जवळ बाळगलेला मिळून आले. या गुन्ह्यात १ लाख ७ हजार रुपये किमतीची रिक्षा व गांजा हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. याबाबत खडकपाडा पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.