निव्वळ लोभ, हव्यास अन् मोह...

लोकलचे धक्के खात, कपडे पिळावे इतका घाम गाळून कमवलेला पैसा मुंबईकरांनी सानपाडा, दादर, भाईंदर अशा विविध भागातल्या ब्रांचमध्ये जात गुंतवला. कोणी घर गहाण ठेवलं, कोणी विकलं, कोणी कर्ज काढलं, कोणी पैसे उधार घेतले, कोणी दागिने विकले. श्रीमंत होण्याची स्वप्न बघत, कोणी हक्काच्या घराचं स्वप्न बघत, कोणी कर्जमुक्त होण्याचं स्वप्न बघत टोरेसमध्ये पैसे गुंतवले आणि आता ही स्वप्नं पूर्ण होणं तर दूरच पण अनेकांची झोप सुद्धा एका चुकीच्या निर्णयाने हिरावून घेतलीये.


सौरभ कोरटकर


लोकलच्या गर्दीत चेंगरणारे, ऑटोचे पैसे वाचवायला बससाठी रांगेत उभे राहणारे, कांदा महाग आहे म्हणून कमी खाणारे, चप्पल तुटली तरी त्यावर महिने काढणारे, हॉटेलमधलं परवडत नाही म्हणून वडापाव खाणारे, प्रत्येक सेकंदाला-मिनिटाला स्वतःच्या इच्छा मारत काटकसर करणाऱ्या  १ लाख २५ हजार मुंबईकरांचे हजार कोटींपेक्षा जास्त पैसे या स्कीममध्ये कायमचे गेलेत. मुंबईतल्या ३१ वर्षीय प्रदीप वैश्य या भाजीवाल्याने १३ कोटी ४८ लाख या टोरेस स्कॅममध्ये गमावले आहेत.
एकदम श्रीमंत सॉफिस्टिकेटेड नाव दिलं. जागोजागी, चकचकीत भुरळ पाडणारे ऑफिस उघडले. असामान्य वाटावं असं कंपनीचं नाव ठेवलं. चकचकीत, मोठा बिजनेस भासावा अशी वेबसाईट उभी केली. एकदम मोठ्या उद्योगाचा आपण भाग होतोय हे पटवून दिलं. कंपनीत विश्वास बसावा म्हणून अनेक विदेशी चेहरे उभे केले. सोने, हिरे, चांदीत  गुंतवणूक करत असल्याचं भासवलंही. गुंतवणिकीवर दर आठवड्याला परताव्याचं आमिष दिलं. ६ लाखांच्या गुंतवणुकीवर आठवड्याभरात ६ टक्के व्याज. ६ लाखांहून अधिक गुंतवणुकीवर ११ टक्के व्याज. म्हणजे वर्षाला ५२० टक्के.


एका लाखाचे ६ लाख,  एक लाख रुपये गुंतवणूक केली तर मोईसॅनाईट स्टोनच्या (लॅब निर्मित हिरे) पेंडंटवर १० हजार रुपयांची सूट दिल्याचं दाखवलं. तसेच ज्वेलरीच्या गुंतवणुकीवर देखील ६ टक्क्यांचा परताव्याचं आमिष दिलं. सुरुवातीला काहीजणांनी पैसे गुंतवले, आठवड्याला परतावा यायला लागला. पैसे येतायत हे दिसल्यावर सगळे आपल्या नातेवाईक, मित्रांनाही  पैसे टाकायला सांगू लागले. यातूनच मुंबईत जागोजागी टोरेसची चैन उभी राहिली. कंपनी गुंतवणूकदारांना त्यांच्याकडे असलेले खडे, ज्वेलरी डिस्काउंटमध्ये द्यायची. गुंतवणूक केलेल्या या ज्वेलरीच्या रकमेवर आठवड्याला परतावा मिळायचा. ही ज्वेलरी, खडे परदेशी आहेत, असं कंपनी सांगायची. हळूहळू आठवड्याला ६ टक्क्यांऐवजी ११ टक्के परतावा कंपनी द्यायला लागली. मग लोभापायी सामान्य माणसं आणखी पैसे टाकायला लागली.  अवघ्या ४००० रुपयांपासून गुंतवणूक करता येत होती. ही कंपनी रविवारी पैसे गुंतवल्यास सोमवार ते शुक्रवारदरम्यान त्याचा परतावा द्यायची. मग कंपनीने उच्चभ्रू इमारतीत घरे, गाड्या आणि दागिने असा आकर्षक परतावा दिला. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास बसला. म्हणून अनेकांनी डोळे झाकून लाखो रुपये टोरेस कंपनीत गुंतवले. हेच बघून वर उल्लेख केलेल्या प्रदीप कुमार वैश्य या


भाजीवाल्याने १३ कोटी ४८ लाख गुंतवले. आपल्या नातेवाईक मित्रमंडळीसह  ३८ लोकांचे पैसेही त्याने यात गुंतवले. मिळालेला परतावा परत टोरेस कंपनीकडे सगळे गुंतवत होते कारण एकच ते म्हणजे आणखी लोभ, हव्यास, ग्रीड, मोह... शेवटी याचा शेवट व्हायचा तोच झाला. एक सकाळ उजाडली आणि कंपनीने फसवणूक केल्याचं लक्षात आलं. कंपनीने दिलेले दागिने पण नकली असल्याचं कळलं. कोट्यधीश होण्याची स्वप्न बघणारे एका रात्रीत देशोधडीला लागले.
लोकलचे धक्के खात, कपडे पिळावे इतका घाम गाळून कमवलेला पैसा मुंबईकरांनी  सानपाडा, दादर, भाईंदर अशा विविध भागातल्या ब्रांचमध्ये जात गुंतवला. कोणी घर गहाण ठेवलं, कोणी विकलं, कोणी कर्ज काढलं, कोणी पैसे उधार घेतले, कोणी दागिने विकले.  श्रीमंत होण्याची स्वप्न बघत, कोणी हक्काच्या घराचं स्वप्न बघत, कोणी कर्जमुक्त होण्याचं स्वप्न बघत टोरेसमध्ये पैसे गुंतवले आणि आता ही स्वप्न पूर्ण होणं तर दुरच पण अनेकांची झोप सुद्धा एका चुकीच्या निर्णयाने हिरावून घेतलीये. गरिबीच्या खाईत लोटलंय. होतं नव्हतं सगळं गेलंय. कंपनीचा मालक युक्रेनला पळून गेलाय. यातून एक रुपया सुद्धा रिकव्हर होईल असं वाटत नाही. बाबांनो आता तरी शहाणे व्हा. घरबसल्या झटपट पैसा मिळत नसतो. श्रीमंत होण्यासाठी पैसा कमवण्या इतकच तो सावधपणे जपणं देखील आवश्यक असतं. नाहीतर प्रत्येक वेळी श्रीमंतीची स्वप्न दाखवत तुम्हाला नागडं करायला आणखी एक स्कीम येईल.

Comments
Add Comment

भारताचे ‘बाहुबली’ यश

नुकतेच ‘इस्रो’चे प्रचंड क्षमतेचे ‘बाहुबली’ रॉकेट प्रक्षेपित करून देशाने आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक पाऊल पुढे

मतांसाठी ‘मोफत आश्वासनां’ची शर्यत

महापालिका निवडणुका जवळ येत आहेत; तसे मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या मोफत आश्वासनांची खैरात

रस्तेबांधणीचा नवा विक्रम

उच्च क्षमतेचे राष्ट्रीय जाळे उभारण्याच्या प्रयत्नांमुळे २०२५ मध्ये भारताच्या रस्ते पायाभूत सुविधांमध्ये

कोल्हापूर, सांगली, इचलकरंजीमध्ये कडवी लढत

वार्तापत्र : दक्षिण महाराष्ट्र काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असणाऱ्या कोल्हापूर, सोलापूर, सांगली या दक्षिण

चला मतदान करूया!

निवडणुकांमध्ये काही मतांच्या फरकाने निकाल बदलले आहेत. एक मत म्हणजे एक आवाज. लाखो मतदारांचा मिळून तयार होणारा हा

कोकणात ओल्या काजूगराची क्रेझ

वार्तापत्र कोकण संतोष वायंगणकर कोकणातील हापूस आंबा, नारळ, फणस, कोकम, काजू, सुपारी, बांबू, जांभुळ, करवंद या