

Kho Kho World Cup 2025: खोखो वर्ल्डकप २०२५मध्ये भारत सेमीफायनलमध्ये दाखल
नवी दिल्ली: खोखो विश्वचषक २०२५मध्ये भारतीय पुरुष संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. क्वार्टरफायनलमध्ये भारताने श्रीलंकेला १००-४० असे हरवत ...
आमदार सतीश चव्हाणांची घरवापसी हा शरद पवारांच्या गटाला धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सुनील तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार सतीश चव्हाण यांनी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकारच्या विरोधात प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने पक्षविरोधी भूमिका घेतली. यामुळे त्यांना सहा महिन्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले. पण सतीश चव्हाण यांनी १३ जानेवारी २०२५ रोजी शरद पवारांच्या नेतृत्वातील पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते शनिवारी शिर्डीतील मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करत आहेत. सतीश चव्हाण हे २००८ पासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे विधान परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत.