Mumbai: शूटिंगला जात असलेल्या टीव्ही अभिनेत्याचा रस्ते अपघातात मृत्यू

मुंबई: टीव्ही मालिका 'धरतीपुत्र नंदिनी' फेम अभिनेता अमन जायसवालचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. हा अभिनेता बाईकवरून शूटिंगसाठी जात होता. यावेळी मुंबईच्या जोगेश्वरी हायवेवर ट्रकने त्याच्या बाईकला टक्कर दिली. यात तो हायवेवर पडला. या अपघातात त्याचा मृत्यू झाला.


अमन जायसवाल हा मूळचा उत्तर प्रदेशातील बलिया येथील होता. तो अभिनेता बनण्याच्या स्वप्नाने मुंबईत आला होता. आपल्या मेहनतीने त्याने आपले स्वप्न पूर्ण केले होते. दरम्यान, या रस्ते अपघातामुळे या अभिनेत्याला कमी वयातच आपले प्राण गमवावे लागले. अमनचे वय केवळ २३ वर्षे इतके होते. २०२३मध्ये नजारा टीव्ही चॅनेलवर धरतीपुत्र नंदिनी ही मालिका सुरू झाली होती. या मध्ये तो पहिल्यांदा मुख्य भूमिकेत होता. याआधी तो उडारिया आणि पुण्यश्लोक अहिल्याबाईक या टीव्हीशोजमध्ये छोट्या मोठ्या भूमिकेत दिसला होता. तो ऑडिशनसाठी होणाऱ्या स्क्रीन टेस्टसाठी शूटिंग करण्यासाठी जात होता.


अमनला सुरूवातीपासूनच अभिनेता बनायचे होते. दरम्यान, त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्याने आयएएस अधिकारी, इंजीनियर अथवा डॉक्टर व्हावे. अमनला त्याच्या आईने साथ दिली होती तसेच वडिलांनाही समजावले होते. अमन अनेकदा आपल्या यशाचे श्रेय आपल्या आईला देत असे.

Comments
Add Comment

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी

Kapuskonda Movie : सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले यांचा 'कापूसकोंडा' येतोय २३ ऑक्टोबरला

मुंबई : माणूस आणि प्राणी यांच्यातील भावभावना, नातेसंबंधांचे धागे मनोरंजक पद्धतीने उलगडणाऱ्या "कापूसकोंडा" या