Friday, February 7, 2025
Homeताज्या घडामोडीMumbai: शूटिंगला जात असलेल्या टीव्ही अभिनेत्याचा रस्ते अपघातात मृत्यू

Mumbai: शूटिंगला जात असलेल्या टीव्ही अभिनेत्याचा रस्ते अपघातात मृत्यू

मुंबई: टीव्ही मालिका ‘धरतीपुत्र नंदिनी’ फेम अभिनेता अमन जायसवालचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. हा अभिनेता बाईकवरून शूटिंगसाठी जात होता. यावेळी मुंबईच्या जोगेश्वरी हायवेवर ट्रकने त्याच्या बाईकला टक्कर दिली. यात तो हायवेवर पडला. या अपघातात त्याचा मृत्यू झाला.

अमन जायसवाल हा मूळचा उत्तर प्रदेशातील बलिया येथील होता. तो अभिनेता बनण्याच्या स्वप्नाने मुंबईत आला होता. आपल्या मेहनतीने त्याने आपले स्वप्न पूर्ण केले होते. दरम्यान, या रस्ते अपघातामुळे या अभिनेत्याला कमी वयातच आपले प्राण गमवावे लागले. अमनचे वय केवळ २३ वर्षे इतके होते. २०२३मध्ये नजारा टीव्ही चॅनेलवर धरतीपुत्र नंदिनी ही मालिका सुरू झाली होती. या मध्ये तो पहिल्यांदा मुख्य भूमिकेत होता. याआधी तो उडारिया आणि पुण्यश्लोक अहिल्याबाईक या टीव्हीशोजमध्ये छोट्या मोठ्या भूमिकेत दिसला होता. तो ऑडिशनसाठी होणाऱ्या स्क्रीन टेस्टसाठी शूटिंग करण्यासाठी जात होता.

अमनला सुरूवातीपासूनच अभिनेता बनायचे होते. दरम्यान, त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्याने आयएएस अधिकारी, इंजीनियर अथवा डॉक्टर व्हावे. अमनला त्याच्या आईने साथ दिली होती तसेच वडिलांनाही समजावले होते. अमन अनेकदा आपल्या यशाचे श्रेय आपल्या आईला देत असे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -