Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीNarayan Rane : क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाचे पुरस्कार जाहीर

Narayan Rane : क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाचे पुरस्कार जाहीर

खा. नारायण राणे “मराठा गौरव”, तर उज्ज्वल तावडे “कुलभूषण”

मुंबई : क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाच्या (मुंबई) वतीने देण्यात येणारा यावर्षीचा मराठा गौरव पुरस्कार राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार नारायणराव राणे यांना जाहीर झाला असून येथे १९ जानेवारी २०२५ रोजी मुंबई येथे होणाऱ्या कौटुंबिक स्नेहमेळाव्यात प्रदान करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तावडे समाज कुलभूषण पुरस्कार पुणे येथील ज्येष्ठ शिक्षणमहर्षी उज्वल जयवंतराव तावडे यांना जाहीर झाला असून त्याचे वितरणही याच कार्यक्रमात होणार असल्याची घोषणा मंडळाचे अध्यक्ष दिनकरराव हिरोजी तावडे यांनी जाहीर केली आहे. दादर पश्चिमेतील डॉ. अँटोनियो डिसिल्वा हॉलमध्ये १९ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी चार ते आठ या कालावधीत या कौटुंबीक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून प्रमुख उपस्थिती महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे आणि ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांची असणार आहे.

Major Dhyan Chand Khel Ratna Award : क्रीडा विश्वातून आनंदाची बातमी! पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वोच्च काम करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार प्रदान

याचवेळी मंडळाच्या वतीने देण्यात येणारा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार चंद्रशेखर श्रीधर तावडे (वाडा), बाळकृष्ण रघुनाथ तावडे (वाल्ये), उदय पांडुरंग तावडे (वाल्ये) यांना जाहीर झाला असून कृषी पुरस्कार विवेक विश्वनाथ तावडे (वाडा), राजेश परशुराम तावडे (नाधवडे) यांना प्रदान करण्यात येणार आहे. उद्योजक पुरस्कार : स्नेहा अनिल तावडे (नाटळ), क्रीडा : रिधान सुनील तावडे (देवधामापूर), ठाणे येथील स्टेशन मास्तर केशव सदानंद तावडे (वाल्ये), आशा स्वयंसेविका : अनुश्री अनंत तावडे, एसीपी महेश रमेश तावडे, डाक पोस्ट कार्यालय उपअधीक्षक सौ. मनाली राजेंद्र तावडे, डाक पोस्ट कार्यालय सहाय्यक उपअधीक्षक प्रफुल्ल महादेव तावडे यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.

२०२४ च्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तावडे कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे. कौटुंबिक जिव्हाळा वाढवण्यासाठी प्रत्येक वर्षी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती सरचिटणीस सतीश तावडे यांनी यावेळी दिली असून तावडे कुटुंबीयांनी यावेळी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -